सुश्मिता-अंशुमनच्या रिसेप्शनमध्ये गोंधळ उडतो.
सुश्मिता समरकडे घरातील हक्क मागते.
मल्लिका सुश्मितासोबत मिळून समर - स्वानंदी विरोधात कट कारस्थान रचते.
'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत सध्या अंशुमन-सुश्मिताचा रिसेप्शनचा कार्यक्रम पाहायला मिळत आहे. अंशुमन चिंगीला फसवूण स्वानंदीच्या बहिणीशी म्हणजेच सुश्मिताशी लग्न करतो. सुश्मिता राजवाड्यांच्या घरी आल्यापासून वेगळाच रुबाब दाखवते. पहिले तिने ग्रँड रिसेप्शनचा हट्ट केला आणि आता समरकडे घरातील सर्वात मोठा अधिकार मागते.
रिसेप्शनसाठी स्वानंदी सुश्मिताला साडी देते मात्र अंशुमन ती बदलून त्या बदल्यात वनपीस ठेवतो आणि सुश्मिता तेच घालून कार्यक्रमाला येते. तिला पाहून सर्वजण थक्क होतात, त्यानंतर सुश्मिता आणि मंदाकिनी स्वानंदीवर आरोप करतात, की तू हे सर्व मुद्दाम केले आहेस. तेव्हा समर स्वानंदीची बाजू घेतो. त्यानंतर मल्लिका सुश्मिताला घेऊन नवीन प्लान आखते. घरात सत्यनारायणाची पूजा पार पडते.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सुश्मिता समरला बोलते की, "काल म्हणाला होतात ना की, मला गिफ्ट देणार आहे म्हणून..." त्यावर समर बोलतो की, "सांग काय हवंय तुला?" तेव्हा सुश्मिता बोलते की, "मला या घरात माझी जागा मिळत नाही आहे. मला ती जागा हवी आहे..." त्यावर उत्तर देत समर म्हणतो की, "तुला जे हवं ते सगळं मिळेल" त्यावर सुश्मिता बोलते, "मला या घरातले अधिकार हवे आहेत आणि तेच माझे गिफ्ट असेल... " हे ऐकताच समर-स्वानंदीला धक्का बसतो. शेवटी स्वानंदी घराच्या किल्ल्या सुश्मिताच्या हातात देते.
व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं की, "समर आणि स्वानंदी सुश्मिताला देणार घरातील सर्वात मोठा हक्क!" आता येणाऱ्या भागांमध्ये सुश्मिता नवा कोणता गोंधळ घालणार आणि सुश्मिताला घरातील चावी मिळाल्यावर कोणते नवीन वादळ येणार हे सर्वच पाहणे मनोरंजक ठरणार आहे. समरचा एक चुकीचा निर्णय राजवाडेंच्या घरात तुफान घेऊन येणार. 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिका संध्याकाळी 7.30 वाजता झी मराठी वाहिनीवर पाहायला मिळते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.