Veen Doghantali Hi Tutena : समर-स्वानंदीच्या आयुष्यात मोठं वादळ; अंशुमन थेट लग्न करूनच घरी येतो, मालिका घेणार 'हे' धक्कादायक वळण | VIDEO

Veen Doghantali Hi Tutena Update : 'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेने धक्कादायक वळण घेतले. समर-स्वानंदीच्या आयुष्यात नवीन वादळ आले आहे. नेमकं घडलं काय, जाणून घेऊयात.
Veen Doghantali Hi Tutena Update
Veen Doghantali Hi Tutena saam tv
Published On
Summary

समर-स्वानंदीच्या आयुष्यात नवं वादळ

अंशुमन थेट लग्न करूनच घरी येतो

चिंगी अंशुमनपासून गरोदर

'वीण दोघांतली ही तुटेना' ही मालिका दिवसेंदिवस अधिक मनोरंजक होत जात आहे. अंशुमनचा खरा चेहरा सर्वांसमोर येतो. चिंगी अंशुमनपासून गरोदर असल्याचे सत्य समजते. त्यामुळे राजवाडेंच्या घरातील लोक अंशुमन आणि चिंगीचे लग्न लावण्याच्या तयारीत असतात. मात्र अशात अंशुमन पुन्हा घरातील लोकांना मोठा धक्का देतो. अंशुमन चक्क लग्न करूनच घरी येतो. याचा खास प्रोमो समोर आला आहे. मालिकेत नेमकं काय घडणार, जाणून घेऊयात.

'वीण दोघांतली ही तुटेना' प्रोमो १

स्वानंदीची बहिण सुष्मिता राजवाडेंच्या घरी येते. तिच्या गळ्यातील मंगळसूत्र पाहून समर आश्चर्यचकित होतो आणि म्हणतो की, "कोण आहे तुझा नवरा, आहे कुठे तो?" त्यानंतर आजी अंशुमनकडे बोट दाखवत हाच सुष्मिताचा नवरा असल्याचे सांगते. त्यावर समरला धक्का बसतो आणि तो बोलतो की, 'चिंगीचं काय आता?' तेवढ्यात अर्पिता येते आणि बोलते की, 'काय चिंगी चिंगी लावलंय...चिंगीपुढे घरातील माणसांना काहीच किंमत नाही का?' त्यावर अर्पिताला खडसावत स्वानंदी म्हणते की, 'तुम्ही कोणाशी बोलताय याचं भान तरी ठेवा...' त्यावर अर्पिता स्वानंदीला म्हणते की, 'तू आमच्यामध्ये बोलू नकोस...' हे ऐकताच समर प्रचंड चिडतो आणि बोलतो की, 'बोलणार कारण बायको आहे ती माझी...विश्वास आहे माझा त्यांच्यावर...नवरा म्हणून माझा पूर्ण पाठिंबा आहे त्यांना...दुसऱ्यांच्या संसारात लुडबुड करण्यापेक्षा स्वतःच्या संसारात लक्ष घाल. आताच्या आता बॅग उचल आणि स्वतःच्या घरी निघून जा' त्यानंतर समर समर अर्पिताला हाताला धरून बाहेर काढतो.

'वीण दोघांतली ही तुटेना' प्रोमो २

अंशुमनची आई चिंगीला बोलते की, 'सगळ्यांना आमच्या विरोधात केल ना तू...चालती हो... माझं जीव जरी गेला ना तरी अंशुमनचे लग्न हिचासोबत मी होऊ देणार नाही...' तेवढ्यात अंशुमन दारावर येतो, तो नवरदेवाच्या रूपात असतो आणि म्हणतो की, 'माझ्या लग्नाची काळजी कोणीच करू नका...कारण माझं लग्न झालंय...मीट माय वाइफ...' अंशुमनचे लग्न झाले हे ऐकताच घरातील सर्वांना ४४० व्होल्टचा धक्का बसतो.

'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत आता धक्कादायक वळण आले आहे. अंशुमनचे असे लग्न करून घरी येणे, आता मालिका कोणते वळण घेणार पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. चिंगीचे पुढे काय होणार? स्वानंदी घडलेला प्रकार कसा सावरणार? समर- स्वानंदीच्या नात्याचे पुढे काय होणार? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात उद्भवले आहे. या व्हिडीओवर प्रेक्षक कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. 'वीण दोघांतली ही तुटेना' ही मालिका सायंकाळी ७:१५ वाजता झी मराठी वाहिनीवर पाहायला मिळते.

Veen Doghantali Hi Tutena Update
Pranit More : ३७० रुपयांच्या बिर्याणी वादात प्रणीत मोरेला प्रसिद्ध अभिनेत्याचा पाठिंबा; ट्रोलर्सना सुनावले खडेबोल, म्हणाला...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com