Tv Actress Puja Banerjee: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरी चिमुकलीचं आगमन; शेअर केला लेकीचा पहिला फोटो

Tv Actress Puja Banerjee: ‘देवों के देव... महादेव’ फेम पूजा बॅनर्जी आणि कुणाल वर्मा दुसऱ्यांदा पालक झाले. त्यांच्या घरी चिमुकल्या मुलीचे आगमन झाले असून पूजाने तिची पहिली झलक शेअर केली.
Tv Actress Puja Banerjee
Tv Actress Puja BanerjeeSaam Tv
Published On

Tv Actress Puja Banerjee: ‘देवों के देव... महादेव’ फेम अभिनेत्री पूजा बॅनर्जी आणि तिचे पती कुणाल वर्मा यांच्या घरी आनंदाचे वातावरण आहे. या कपलने आपल्या दुसऱ्या बाळाचे स्वागत केले असून, त्यांच्या घरी चिमुकल्या मुलीचे आगमन झाले आहे. पूजाने सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. तसेच तिने आपल्या मुलीची पहिली झलकही दाखवली आहे.

पूजाने दाखवली मुलीची पहिली झलक

पूजा बॅनर्जीने इन्स्टाग्रामवर एक छोटा व्हिडिओ शेअर करत आपल्या ‘लिटल एंजेल’ची पहिली झलक चाहत्यांना दाखवली. या पोस्टला तिने ‘माझ्या मुलीची पहिली झलक’ असे कॅप्शन दिले. मात्र, कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर राखत अभिनेत्रीने मुलीबाबत फारशी माहिती दिली नाही.

Tv Actress Puja Banerjee
Actress Injured: लाइव्ह परफॉर्मन्सदरम्यान प्रसिद्ध गायिकेवर हल्ला; चेहऱ्यावर गंभीर दुखापत

पूजा आणि कुणाल यांनी त्यांच्या युट्यूब चॅनेलवर बाळाच्या जन्माच्या खास क्षणांचा व्हिडिओही शेअर केला आहे. नर्सने मुलगी झाल्याची बातमी दिल्यानंतर संपूर्ण कुटुंबाचा आनंद या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतो. विशेष म्हणजे, कपलचा मोठा मुलगा पहिल्यांदाच आपल्या लहान बहिणीला भेटतानाचा भावनिक क्षणही यात कैद करण्यात आला आहे.

एप्रिलमध्ये जाहीर केली होती गरोदरपणाची बातमी

पूजा आणि कुणाल यांनी एप्रिल २०२६ मध्ये युट्यूब व्हिडिओद्वारे दुसऱ्यांदा पालक होणार असल्याची बातमी चाहत्यांना दिली होती. त्यानंतर पूजाने इन्स्टाग्रामवरही ही आनंदाची बातमी शेअर केली होती. प्रेग्नन्सी टेस्टचा निकाल समजल्यानंतरचा क्षणही तिने व्हिडिओच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केला होता.

Tv Actress Puja Banerjee
Director Hospitalized: प्रसिद्ध दिग्दर्शकाची प्रकृती गंभीर; रुग्णालयात व्हेंटिलेटरवर उपचार

२०२० मध्ये झाला होता पहिल्या मुलाचा जन्म

पूजा आणि कुणाल ऑक्टोबर २०२० मध्ये पहिल्यांदा आई-बाबा झाले होते. आता त्यांच्या कुटुंबात चिमुकल्या मुलीचे आगमन झाल्याने त्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे. या संपूर्ण प्रवासाला त्यांनी व्हिडिओंच्या माध्यमातून टिपले असून, दुसऱ्यांदा आई-बाबा होण्याचा अनुभवही चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

टीव्ही मालिकांमधून मिळाली लोकप्रियता

पूजा बॅनर्जीने ‘देवों के देव... महादेव’ आणि ‘कॉमेडी नाइट्स बचाव’ यांसारख्या लोकप्रिय कार्यक्रमांमध्ये काम केले आहे. तर कुणाल वर्माने ‘तुझ संग प्रीत लगाई सजना’, ‘हवन’, ‘देवों के देव... महादेव’ आणि ‘दिल से दिल तक’ यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. दोघांनी लग्नापूर्वी एकत्र काम केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com