Tumbadchi Manjula collection: देऊळबंद २, 'राजा शिवाजी'नंतर आता 'तुंबाडची मंजुळा'ची चर्चा; आठवडाभरा किती झाली कमाई?

Tumbadchi Manjula Earnings : सई ताम्हणकर आणि जितेंद्र जोशी यांचा तुंबाडची मंजुळा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धूमाकूळ घालतोय. फक्त सहा दिवसांत या चित्रपटाने ६ कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.
Tumbadchi Manjula box office collection
Tumbadchi Manjula box office collectiongoogle
Published On

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या यशाची नवी लाट पाहायला मिळत आहे. 'राजा शिवाजी' आणि 'देऊळ बंद 2' यांच्या यशानंतर आता 'तुंबाडची मंजुळा' हा चित्रपट प्रेक्षकांची पहिली पसंत ठरतोय. ५ जून रोजी महाराष्ट्रात हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. सई ताम्हणकर आणि जितेंद्र जोशी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने आता ६ दिवसांत ६ कोटींचा टप्पा पार केला आहे.

तुंबाडची मंजुळा या एक हॉरर-कॉमेडी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत सर्वांचं लक्ष वेधलं. या चित्रपटाने सहा दिवसांमध्ये ५.५१ कोटी रुपयांचं नेट कलेक्शन आणि ६.६४ कोटी रुपयांचं ग्रॉस कलेक्शन केलं आहे. एकूण ६०७ शोमधून ५५ लाख रुपयांची कमाई यांनी केली आहे. पुढे आपण koimoi ने दिलेल्या माहितीनुसार सहा दिवसांची कमाई जाणून घेणार आहोत.

Tumbadchi Manjula box office collection
Gold Rate Today: सोन्याच्या किंमतीत आत्तापर्यंतची सर्वात मोठी घसरण, चांदी तब्बल ११ हजारांनी स्वस्त, पाहा ताजे दर

आतापर्यंतचे बॉक्स ऑफिस कलेक्शन

दिवस १ - ५४ लाख

दिवस २ - ९८ लाख

दिवस ३ – १.७३ कोटी

दिवस ४ – ७० लाख

दिवस ५ – ७२ लाख

दिवस ६ – ६० लाख

चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन प्रदर्शनाच्या शोमध्येही मोठी वाढ करण्यात आली आहे. पहिल्या दिवशी राज्यभरात ३९१ शो आयोजित केले होते. रविवारी ही संख्या ५०० पर्यंत पोहोचली, तर सोमवारी तब्बल ६०० पेक्षा जास्त शो दाखवण्यात आले. सातव्या दिवशीही ६०७ शोमध्ये चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. मुळात तुंबाडची मंजुळा हा चित्रपट ६ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला आहे. तर या चित्रपटात सई ताम्हणकर, जितेंद्र जोशी, ओम भुतकर, मकरंद अनासपुरे आणि उमेश जगताप यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत.

Tumbadchi Manjula box office collection
Chanakya Niti : मुलांना यशस्वी आणि समजुदार बनवायचंय? मग लहानपणीच शिकवा या ६ गोष्टी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com