Gold Rate Today: सोन्याच्या किंमतीत आत्तापर्यंतची सर्वात मोठी घसरण, चांदी तब्बल ११ हजारांनी स्वस्त, पाहा ताजे दर

Gold Price At Jalgaon Sarafa Market: जळगाव सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात सर्वात मोठी घसरण झालेली आहे. चांदीतही मोठी घसरण झाली आहे. तुम्ही सोनं खरेदी करणार असाल तर ही चांगली संधी आहे.
gold price crash
gold price crashgoogle
Published On

सोने - चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी ही अत्यंत महत्वाची बातमी आहे. सुवर्णनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावातला सराफा बाजार उघडताच सोनं आणि चांदीच्या किंमतीमध्ये सर्वात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. यामध्ये सोन्याच्या किंमतीत तब्बल ४ हजार रुपयांची तर चांदीच्या किंमतीमध्ये तब्बल ११ हजार रुपयांची घसरण झालेली पाहायला मिळाली आहे.

gold price crash
8th Pay Commission Pension: कर्मचाऱ्यांना लॉटरी लागणार! जुनी पेन्शन योजनेबाबत नवी माहिती समोर

सोन्याचे दर जीएसटीसह १ लाख, ५१ हजार ४१० रुपये इतके आहेत. तर चांदीचे दर हे जीएसटीसह २ लाख ४५ हजार १४० रुपयांवर आले आहेत. ही घसरण बुधवार १० जून २०२६ची आहे. जशा किंमती कमी झाल्या तशी अनेकांनी दागिन्यांची खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केली. या किंमतीपाहून ग्राहकांना दिलासा मिळाला. पण ही घसरण तात्पुरती आहे की, कायमची याकडे गुंतवणूकदार आणि ग्राहकांचं लक्ष आहे.

मागच्या दोन दिवसांपासून सोनं चांदीच्या किंमती वाढत होत्या. तर मौल्यलान धातूंच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमती प्रति औंस ४.४ डॉलरची घसरण नोंदवली गेली आहे. त्याचा थेट परिणाम भारतीय बाजारावही दिसून आला.

तज्ज्ञांच्या मते, वायदे बाजारात वाढलेल्या विक्रीमुळे दोन्ही धातूंवर दबाव निर्माण झाला आहे. त्यामुळे घाऊक आणि किरकोळ सराफा बाजारातले दर खाली आले आहेत. वाढत्या किमतींमुळे खरेदी पुढे ढकलणाऱ्या ग्राहकांसाठी ही घसरण दिलासादेणारी ठरणार आहे.

gold price crash
PM Kisan Yojana : पुढच्या आठवड्यात पीएम किसान योजनेचा हप्ता येणार, खात्यात ₹२००० जमा होणार? वाचा महत्वाची अपडेट

जळगावात सोने किती रुपयांनी स्वस्त झालं?

मंगळवारी २४ कॅरेट सोन्याच्या किंमतीत १,२३६ रुपयांची वाढ होऊन तीन टक्के जीएसटीसह प्रति १० ग्रॅम दर १,५६,२५१ रुपयांवर पोहोचला होता. पण, बुधवारी बाजार उघडताच सोन्याच्या दरात ३,८११ रुपयांची मोठी घसरण झाली. त्यामुळे २४ कॅरेट सोन्याचा दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,५२,४४० रुपये झाला आहे.

चांदीच्या दरातही मोठी घसरण

चांदीच्या दरातही बुधवारी मोठी घसरण झालेली पाहायला मिळत आहे. मंगळवारी चांदीचा दर तीन टक्के जीएसटीसह प्रति किलो २,५६.४७०, रुपयांवर स्थिर होता. पण, बुधवारी सकाळी बाजार सुरू होताच चांदी तब्बल १०,३०० रुपयांनी स्वस्त झाली. चांदीचा दर जीएसटीसह प्रति किलो २,४६,१७० रुपयांवर घसरला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com