Gold Jewelry Polish : घरच्याघरी सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश कशी करायची? सोनार तुम्हाला 'ही' गोष्ट कधीच नाही सांगणार

Gold Jewelry Polish at Home: घरच्याघरी सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करून नव्या सारखे चमकवा. चांदीचे दागिने सुद्धा चकचकीत व्हावे यासाठी हिच ट्रिक वापरा.
Gold Jewelry Polish at Home
Gold Jewelry PolishSaam TV
Published On

सोनं हा असा धातू आहे ज्याची प्रत्येक व्यक्तीला आवड आहे. सोन्याच्या दागिन्यांसाठी व्यक्ती पै पै करून पैसे साठवतात आणि दागिने बनवतात. सोन्याचे दागिने अन्य धतुपेक्षा जास्त काळ टिकणारे असतात. हे दागिने कधीच खराब होत नाहीत. पिढ्या न पिढ्या व्यक्ती हे सोन्याचे दागिने वापरतात.

Gold Jewelry Polish at Home
Gold Silver Price Down : सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदीच्या किंमती घसरल्या; वाचा तुमच्या शहरातील आजचा भाव

आता तुमच्या घरात सुद्धा सोन्याचे सुंदर सुंदर दागिने असतीलच. सोन्याचे दागिने फार आकर्षक दिसतात. मात्र आजकाल चोरीच्या भीतीने अनेक व्यक्ती दररोज सोन्याचे दागिने घालत नाहीत. कधी तरी हे दागिने परिधान केले जातात. घरात लग्नकार्य आल्यावर घरातील मोठ्या व्यक्ती आपल्याकडे ठेवलेले दागिने सर्वांना परिधान करण्यासाठी देतात.

दागिने फार जुने असल्यास ते थोडे काळे दिसतात. त्यामुळे हे दागिने पुन्हा नव्यासारखे चकचकीत व्हावे यासाठी आपण पुन्हा सोनाराच्या दुकानात जातो आणि दागिन्यांना पॉलिश करून घेतो. काही व्यक्तींचा असा समज आहे की पॉलिश केलेले दागिने त्यातील सोनं कमी होतं. शिवाय सोनार याचे पैसे सुद्धा घेतात. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी घराच्या घरी सोन्याचे दागिने कसे पॉलिश करायचे याची माहिती आणली आहे.

साहित्य

पाणी

भांडी घासण्याचे लिव्हिड

ब्रश

टूथ पेस्ट

हे सर्व साहित्य घ्या, त्यानंतर एका भांड्यात पाणी घ्या. पाणी थोडं कोमट करून घ्या. या कोमट पाण्यात डिशवॉश लिक्वीड मिक्स करा. त्यानंतर यामध्ये दागिने भिजत ठेवा. साधारण 10 ते 15 मिनिटे दागिने यात आहेत तसेच ठेवा. नंतर एका ब्रशवर टूथपेस्ट घ्या आणि दागिन्यांवर घासून घ्या. असे केल्याने तुमचे दागिने आहेत त्यापेक्षा चाचाकित होतील. जणू काही आताच दुकानातून खरेदी केली आहे अशा पद्धतीने दागिन्यांना चकाकी येईल.

चांदीचे दागिने कसे स्वच्छ करायचे

चांदीचे दागिने सुद्धा चकचकीत व्हावे यासाठी हिच ट्रिक वापरा. त्यासाठी एका भांड्यात पाणी घ्या. त्यात डिश वॉश लिक्वीड टाकून ठेवा. त्यानंतर या पाण्यात चांदीचे दागिने टाकून ठेवा. चांदीचे दागिने खूप लवकर आणि खूप जास्त काळे पडतात. त्यामुळे यात थोडा लिंबू रस मिक्स करा. या टीप्सने तुमचे चांदीचे दागिने सुद्धा अगदी चकचकीत होतील.

Gold Jewelry Polish at Home
Gold Price Today : सोनं २५०० रुपयांनी झालं स्वस्त; कोणत्या शहरात किती भाव? १० तोळ्याची किंमत जाणून घ्या!

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com