PM Kisan Yojana : पुढच्या आठवड्यात पीएम किसान योजनेचा हप्ता येणार, खात्यात ₹२००० जमा होणार? वाचा महत्वाची अपडेट

PM Kisan 23rd Installment Date : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या तीन महिन्यांपासून शेतकरी पीएम किसान योजनेचा हप्ता कधी येणार याची वाट पाहत होते. यासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे,.
PM Kisan Yojana big update
PM Kisan Yojana big updategoogle
Published On

PM Kisan 23rd Installment: शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजना राबवली जाते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये आर्थिक मदत म्हणून दिले जातात. आत्तापर्यंत २२ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवले आहेत. आता मागील काही वर्षांच्या अंदाजानुसार २३ वा हप्ता हा १८ जूनला येण्याची शक्यता आहे. पण गेल्या ३ महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवले नाहीत. त्यामुळे पुढच्या आठवड्यात पैसे येतील की नाही? अशा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

पीएम किसानचा २३वा हप्ता कधी येणार? (PM Kisan Yojana 23rd Installment Date)

भारतातले अनेक शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ घेतात. तर शेतकऱ्यांच्या खात्यात २२ वा हप्ता हा १३ मार्च २०२६ रोजी आला होता. तेव्हापासून शेतकरी २३ वा हप्चा कधी येणार याची पाट पाहत आहेत. तर काही रिपोर्टनुसार, शेतकऱ्यांच्या खात्यात २३ वा हप्ता येण्याची शक्यता आहे. पण हे कशाच्या आधारावर बोलतायेत? हे जाणून घेऊयात.

PM Kisan Yojana big update
Chanakya Niti : या 3 गोष्टींवर खर्च करताना कधीही कंजूषी करू नका; अन्यथा आयुष्यभर राहाल मागे

23 वा हप्ता पुढच्या आठवड्यात येणार का? ( 23rd installment of PM Kisan come next week?)

बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये चर्चा सुरु आहे की, पुढच्या आठवड्यात पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता (PM Kisan Yojana 23rd Installment) येईल. यामागचं कारण म्हणजे, मागील काही वर्षांमध्ये साधारण जून-जुलै महिन्यात हप्ता दिला गेला होता. यातला १७ वा हप्ता हा जून महिन्याच्या १८ तारखेला २०२४ रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात दिला गेला होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आहे आहे, पुढच्या आठवड्यापासून २३ व्या हप्त्याची वाट पाहावी लागणार नाही?

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी म्हणजे, सरकारने अजून कोणत्याही प्रकारची पीएम किसानबाबतची घोषणा केलेली नाही. त्यामुळे आपण आठवड्यात हप्ता येईल हे ठरवणं चुकीचं ठरू शकतं. पण मागच्या काही वर्षांचा अंदाज घेता जून- जुलैमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवले जातात.

PM Kisan Yojana big update
घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार! 'या' बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त Home Loan

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com