
रिझर्व्ह बँकेने रेपो रेट 5.25 टक्क्यांवर कायम ठेवला आहे. त्यामुळे सध्या होम लोनच्या ईएमआयमध्ये वाढ होणार नाही, अशी शक्यता आहे. महागाई आणि जागतिक आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन आरबीआयने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नवीन कर्ज घेणाऱ्यांना स्थिर व्याजदराचा फायदा मिळणार आहे.
सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ इंडिया या बँकांमध्ये 7.10 टक्क्यांपासून होम लोन दिलं जातं. त्यामुळे या बँका सध्या सर्वात स्वस्त पर्यायांपैकी मानल्या जातात. कर्जाच्या दाराच्या क्रेडिट स्कोअर आणि पात्रतेनुसार याच्या व्याजाचा दर ठरवला जातो. त्यामुळे अर्जाआधी सर्व अटी तपासणं महत्वाचं आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया 7.25 ते 9.05 टक्क्यांपर्यंत व्याजदराने होम लोन देते. तर बँक ऑफ बडोदाचे दर 7.20 टक्क्यांपासून सुरू होतात. देशातील मोठ्या सरकारी बँका असल्यामुळे ग्राहकांचा या बँकांवर मोठा विश्वास आहे.
युनियन बँक ऑफ इंडिया 7.15 ते 9.60 टक्के दरम्यान होम लोन देत आहे. तर कॅनरा बँकेचे व्याजदर 7.25 ते 10 टक्क्यांपर्यंत आहेत.
इंडियन ओव्हरसीज बँकेत पगारदार ग्राहकांसाठी होम लोनचा व्याजदर 7.10 टक्क्यांपासून सुरू होतो. तर स्वयंरोजगार किंवा इतर ग्राहकांसाठी हा दर 8.20 टक्क्यांपासून आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.