PM Kisan Yojana: शेतकऱ्यांनो, 'ही' २ कामं आताच करा, अन्यथा २००० रुपयांचा हप्ता होणार बंद; पीएम किसान योजनेचे मोठे अपडेट

PM Kisan 23rd Installment: शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती आहे. तुम्ही पीएम किसान योजनेचा हप्ता घेत असाल तर पुढील २ प्रोसेस करणं अनिवार्य आहे. अन्यथा तुमच्या खात्यात कोणताही निधी गोळा होणार नाही.
PM Kisan Yojana Update
PM Kisan Yojana Updategoogle
Published On

शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून सरकार अनेक योजना राबवत आहे. पीएम किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये दिले जातात. हे पैसे ४ महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले जातात. आता शेतकरी या योजनेचा २३ वा हप्ता घेणार आहेत. पण तुम्ही जर पुढील गोष्टी केल्या नाहीत तर तुम्हाला पुढे कोणताच हप्ता मिळणार नाही.

पीएम किसान योजनेचा (PM Kisan Yojana 23rd Installment) लाभ आत्तापर्यंत अनेक शेतकऱ्यांनी घेतला आहे. पण २२ वा हप्ता बऱ्याच शेतकऱ्यांना मिळाला नव्हता. याचं कारण म्हणजे त्यांनी ईकेवायसीची प्रक्रिया पूर्ण केली नव्हती. तसेच आता अॅग्रीस्टॅक (agristack)आयडी शेतकऱ्यांकडे असणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

PM Kisan Yojana Update
LPG Cylinder Price: एलपीजी सिलेंडर ६५८ रुपयांनी स्वस्त मिळतोय, १०.५८ कोटी कुटुंबांना ९५८ रुपयांचा बंपर फायदा, पाहा नेमकं गणित

तुम्ही शेतकरी असाल आणि सरकारच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्याकडे हा Farmer ID असणं बंधनकारक आहे. तुम्हाला हा आयडी हवा असेल तर तुम्ही मोबाईलवरून किंवा जवळच्या महा-ई सेवा केंद्रावर (csc) जाऊन नोंदणी करू शकता. त्यासाठी तुमच्याकडे काही कागदपत्रे असणे आवश्यक आहेत ती पुढील प्रमाणे आहेत.

Agristack आयडीसाठी पुढील कागदपत्रे आवश्यक आहेत:

  • आधार कार्ड जे मोबाईल नंबरशी लिंक केलेले असावे

  • जमिनीचा 7/12 आणि 8 अ उतारा

  • बॅंकेचे पासबुक ईकेवायसी केलेले

तुम्ही अजून ईकेवायसी केली नसेल तर तुम्हाला पुढील हप्ता मिळणार नाही. त्यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो करून ही प्रोसेस फॉलो करावी लागेल.

  • पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटला म्हणजेच (https://pmkisan.gov.in/) ला भेट द्या.

  • ईकेवायसी हा पर्याय निवडा

  • पुढे तुमचा आधार कार्डचा नंबर अचूक पद्धतीने लिहा.

  • तुम्हाला रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर ओटीपी आलाय का ते तपासा.

  • आता ओटीपी सबमिट करा.

  • शेवटी ईकेवायसीची दिलेली प्रोसेस करून पुन्हा सबमिट करा.

PM Kisan Yojana Update
Gold Rate Today : खुशखबर! सोनं ₹१०००० ने झालं स्वस्त, प्रति तोळा किंमत किती? वाचा १८,२२ अन् २४ कॅरेटचे ताजे दर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com