हल्लेखोरांचं पहिलं लक्ष्य टायगर श्रॉफ नव्हता
बॉलिवूडचा खान हल्लेखोरांच्या निशाण्यावर
सुपरस्टाच्या घराची तीन वेळा रेकी
साम टीव्ही प्रतिनिधी - साक्षी यादव
मुंबईत बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर झालेल्या गोळीबार प्रकरणात तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात हल्लेखोरांचं पहिलं लक्ष्य अभिनेता आमिर खान असल्याचा तपास यंत्रणेला संशय आहे. याची चौकशी करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यामुळे या प्रकरणाला आता नवं वळण मिळाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आमिर खानपर्यंत पोहोचण्यात अडचणी येत असल्याने हल्लेखोरांनी टायगर श्रॉफला टार्गेट केल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. आमिर खानच्या घराजवळ हल्लेखोरांनी किमान तीन वेळा रेकी केल्याची माहितीही समोर आली आहे. मात्र, आमिर खान चित्रपटाच्या शूटिंगसाठी बाहेर असल्याने किंवा अनेक दिवस घराबाहेर न पडल्याने हल्लेखोरांना कथित कट अंमलात आणण्याची संधी मिळाली नसल्याचा तपासातील दावा आहे.
तपासाशी संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार, आमिर खानच्या तुलनेत टायगर श्रॉफ अधिक सहज उपलब्ध होऊ शकत असल्याने त्याला टार्गेट करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. टायगर श्रॉफ रविवारी फुटबॉल खेळण्यासाठी घराबाहेर पडत असल्याची माहिती हल्लेखोरांना होती, त्यामुळे ते टायगर श्रॉफच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते.
दरम्यान, जुलै महिन्यात आमिर खानला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून धमक्या मिळाल्याची माहिती समोर आली होती. या पार्श्वभूमीवर टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणाचा आणि आमिर खानला मिळालेल्या कथित धमक्यांचा काही संबंध आहे का, याचाही तपास सुरू असल्याचे सांगितले जात आहे.तपास यंत्रणांच्या पुढील कारवाईकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.