प्रसिद्ध अभिनेत्रीने चाहत्यांना दिली गुडन्यूज
अभिनेत्री लग्नाच्या दीड वर्षांनंतर झाली आली.
गुडन्यूज देत सांगितले मुलाचे नाव
मनोरंजन विश्वातून आनंदाची बातमी समोर आली आहे. 'सनम तेरी कसम' फेम अभिनेत्री मावरा होकेन (Mawra Hocane) आई झाली आहे. मावरा आणि तिचा नवरा अमीर गिलानी यांनी ही सुखद बातमी चाहत्यांना दिली आहे. सध्या सोशल मीडियावर या जोडप्याची चर्चा रंगली आहे. आपल्या सोशल मिडिया अकाउंटवर एक खास पोस्ट शेअर करून अभिनेत्रीने ही आनंदाची बातमी जाहीर केली आहे.
अभिनेत्रीने आपल्या मुलाच्या नावाचा अर्थही सांगितला. तिच्या पोस्टनुसार, 'अझमर'चा अर्थ 'सिंह' असा होतो. तिने आपल्या मुलाचे वर्णन करताना त्याला "आमच्या जंगलाचा राजा, आमचा अभिमान आणि आमचा सर्वात मौल्यवान खजिना" असे म्हटले आहे. सोशल मीडियावर ही बातमी जाहीर होताच, या जोडप्यावर अभिनंदनाचा , शुभेच्छांचा वर्षाव चाहते आणि कलाकार मंडळी करत आहेत.
मावराने फेब्रुवारी २०२५ मध्ये अमीरसोबत लग्नगाठ बांधली होती. अमीर गिलानीही एक अभिनेता आहे. मावराने २०१६ मध्ये 'सनम तेरी कसम' या रोमँटिक ड्रामा चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.