Celebrity MastarChef Finale: 'सेलिब्रिटी मास्टरशेफ' या लोकप्रिय कुकिंग रिअॅलिटी शोचा ग्रँड फिनाले लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या शोमध्ये विविध सेलिब्रिटींनी आपल्या स्वयंपाक कौशल्यांचे प्रदर्शन केले आहे. फिनालेमध्ये टॉप ५ स्पर्धकांमध्ये तेजस्वी प्रकाश, गौरव खन्ना, निक्की तंबोळी, मिस्टर फैसू, आणि राजीव अदातिया यांचा समावेश आहे.
फिनाले एपिसोडमध्ये तेजस्वी प्रकाशच्या समर्थनार्थ तिचा बॉयफ्रेंड करण कुंद्रा उपस्थित राहणार आहे. या विशेष उपस्थितीमुळे फिनालेची रंगत आणखी वाढणार आहे. शोचे होस्ट फराह खान आणि जजेस विकास खन्ना व रणवीर ब्रार यांच्या उपस्थितीत हा फिनाले एपिसोड अधिक रोचक ठरणार आहे. प्रेक्षकांना आपल्या आवडत्या सेलिब्रिटींच्या कुकिंग कौशल्यांचा आनंद घेता येईल.
रंगांधळा अभिनेताही फिनालेमध्ये
रंगांधळा अभिनेता देखील फिनालेपर्यंत पोहोचला आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून सर्वांचा लाडका अनुपमाचा अनुज म्हणजेच गौरव खन्ना आहे. अलीकडेच, अंतिम फेरीपूर्वी, स्पर्धकांमध्ये स्पर्धा आणखी रोमांचक करण्यासाठी, प्रसिद्ध शेफ राहुल राणा यांनी आतापर्यंतचे सर्वात कठीण आव्हान सादर केले. सर्व स्पर्धकांना सहा वेगवेगळ्या चवींचा बनलेला, २२ घटकांचा आणि १५० अचूक पायऱ्यांचा बनलेला, शाद्रास हा पदार्थ बनवायचा होता.
निवडलेल्या या पाचपैकी टॉप ३ फायनलिस्टमध्ये फैजू, गौरव खन्ना आणि राजीव अदातिया यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. 'सेलिब्रिटी मास्टरशेफ'चा ग्रँड फिनाले ११ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन आणि सोनी लिव्ह अॅपवर प्रसारित होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.