'The Bads Of Bollywood' मधील प्रसिद्ध अभिनेत्याला एकामागोमाग एक चित्रपटांची लॉटरी, जान्हवी कपूरसोबत झळकणार?

Lakshya Lalwani :  'बॅड्स ऑफ बॉलिवूड' खूप गाजला. यात अनेक मोठ्या कलाकारांनी काम केले आहे. यातील प्रसिद्ध अभिनेत्याला 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'च्या यशानंतर चार चित्रपटांची लॉटरी लागली आहे.
Lakshya Lalwani
The Bads Of BollywoodSAAM TV
Published On
Summary

आर्यन खानचा  'बॅड्स ऑफ बॉलिवूड' सोशल मीडियावर तुफान गाजत आहे.

'बॅड्स ऑफ बॉलिवूड' मधील प्रसिद्ध अभिनेत्याला एकामागोमाग एक चित्रपटांची लॉटरी लागली आहे.

'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधील अभिनेता आता जान्हवी कपूरसोबत काम करणार असल्याचे बोले जात आहे.

शाहरुख खानचा लेक आर्यन खान सध्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मुळे (The Bads Of Bollywood) चांगलाच चर्चेत आहे. 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'ला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सीरिजमध्ये अनेक सुपरहिट कलाकार झळकले आहेत. ज्यांच्या अभिनयाचे कौतुक केले जात आहे. चित्रपटात अभिनेता लक्ष्य लालवानी मुख्य भूमिकेत झळकला आहे. लक्ष्य लालवानीला 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मुळे खूप लोकप्रियता मिळाली आहे. त्याला एकामागोमाग चार चित्रपटांची लॉटरी लागली आहे.

'बॅड्स ऑफ बॉलिवूड' पूर्वी लक्ष्य (Lakshya Lalwani) 'किल' या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिले आहे. आता 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'नंतर लक्ष्य 'चाँद मेरा दिल' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात त्यांच्यासोबत अनन्या पांडे झळकणार आहे. चाहते या चित्रपटासाठी खूपच उत्सुक आहेत. ही एक प्रेम कथा आहे. त्यानंतर 'दोस्ताना 2'मधून लक्ष्य प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. असे बोले जाते की, 'दोस्ताना 2' नवीन वर्षात 2026मध्ये रिलीज होईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे सर्व चित्रपट धर्मा प्रोडक्शनचे आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, लक्ष्य लालवानीला धर्मा प्रोडक्शनच्या आणखी एका चित्रपटाची लॉटरी लागली आहे. त्याने नवीन चित्रपट साइन केला आहे. या चित्रपटात तो जान्हवी कपूरसोबत झळकणार असल्याचे बोले जात आहे. तसेच चित्रपटात टायगर श्रॉफही असेल. या चित्रपटात ॲक्शन आणि रोमान्स पाहायला मिळणार आहे. मात्र अद्याप चित्रपटाची अधिकृत घोषणा झाली नाही आहे. 'किल', 'चाँद मेरा दिल' आणि 'दोस्ताना २' नंतर लक्ष्य लालवानी जान्हवी कपूरसोबत नवीन चित्रपटात दिसेल.

'बॅड्स ऑफ बॉलिवूड' मधून आर्यन खानने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. 18 सप्टेंबर 2025ला 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' रिलीज झाला. यात तगडी स्टारकास्ट पाहायला मिळाली. लक्ष्य लालवानीसोबतच चित्रपटात साहेर बंब,राघव जुयाल, रजत बेदी, मोना सिंग, बॉबी देओल, इम्रान हाश्मी, करण जोहर, आमिर खान आणि सारा अली खान असे अनेक कलाकार पाहायला मिळाले.

Lakshya Lalwani
Annu Kapoor : "क्या दूधिया बदन है"; 69 वर्षीय अन्नू कपूर यांचं तमन्ना भाटियाबद्दल आक्षेपार्ह विधान, नेटकरी संतापले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com