तमन्ना भाटियाला 'आज की रात' या गाण्यामुळे खूप लोकप्रियता मिळाली आहे.
अभिनेते अन्नू कपूर यांनी तमन्ना भाटियाबद्दल आक्षेपार्ह विधान केले आहे.
अन्नू कपूर यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात आहे.
बॉलिवूड अभिनेते आणि गायक अन्नू कपूर (Annu Kapoor) कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चे असतात. ते अनेक वेळा आपल्या विधानांमुळे अडचणीत येतात. आता देखील अन्नू कपूर आपल्या वक्तव्यामुळे तुफान ट्रोल होत आहेत. अन्नू कपूर यांनी अभिनेत्री तमन्ना भाटिया विषयी एक विधान केले आहे. नुकत्याच झालेल्या एका मिडिया मुलाखतीत अन्नू कपूर तमन्ना भाटियाविषयी (Tamannaah Bhatia) असे काही बोले की ते आता प्रचंड ट्रोल होत आहे.
अभिनेत्री तमन्ना भाटिया ही आपल्या हटके डान्स आणि लूकसाठी प्रसिद्ध आहे. तमन्ना भाटियाला 'आज की रात' या गाण्यामुळे खूप लोकप्रियता मिळाली आहे. अलिकडेच झालेल्या एका मुलाखतीत तमन्ना भाटियाने सांगितले होते की, "आई आपल्या मुलाला झोपवण्यासाठी जेवण भरवताना 'आज की रात' गाणं लावते."
शुभंकर मिश्रा यांना दिलेल्या मुलाखतीत, अन्नू कपूर यांनी तमन्ना भाटियाच्या शरीराला 'दूधिया बदन' असे म्हटले आहे. जेव्हा होस्टने अन्नू कपूर यांना तमन्ना भाटियाचे 'आज की रात' हे गाणे आवडले का? असे विचारले, तेव्हा ते लगेच उत्साहाने बोलले की, "माशाअल्लाह क्या दूधिया बदन है"
मुलाखतीत त्यानंतर होस्ट म्हणाले की, "हे गाणे ऐकल्यानंतर मुले लगेच झोपी जातात." त्यावर अन्नू कपूर म्हणाले, "झोपी जाणारी मुले किती वर्षांची असतात? 70 वर्षांचे लहान मुलं असू शकते ना, जर मी तेथे असतो तर मी विचारले असते की, किती वर्षांची मुले झोपी जातात. इंग्रजीत म्हणतात की तो 70 वर्षांचा मुलगा आहे आणि हा 11 वर्षांचा म्हातारा आहे. ताई आपल्या मुलांना तिच्या गाण्यांनी, तिच्या शरीराने आणि तिच्या दुधाळ चेहऱ्याने झोपवते. ही चांगली गोष्ट आहे. आपली मुले शांत आणि निरोगी झोपली तर ते देशासाठी चांगले आहे. जर तुमच्या इतर काही इच्छा असतील तर देव त्या पूर्ण करो."
तमन्ना भाटिया हिच्यावरील कमेंटनंतर अन्नू कपूर यांना सोशल मीडियावर खूप ट्रोल केले जात आहे. नेटकरी त्यांना खूप वाईट बोलत आहे. "अन्नू कपूर इतके अश्लील वक्तव्य कसं करू शकतात...", "तुम्ही स्वतःच्या मुलीसाठी असे शब्द वापरू शकता का...", " थोडा तरी आदर ठेवा...", तुमच्या घरी मुलगी किंवा नातवंडे नाहीत का? अशा कमेंट्स केल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.