Tamannaah Bhatia : 'विजय' नाव घेताच तमन्ना भाटिया लाजत लाजत हसली, म्हणाली...

Tamannaah Bhatia video : तमन्ना भाटिया सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत आहे. यातच तमन्ना भाटियाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Tamannaah Bhatia video
Tamannaah BhatiaSAAM TV
Published On

तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलेच चर्चेत आहे. नुकताच तमन्ना भाटिया आणि विजय वर्माचा ब्रेकअप झाला आहे. सध्या त्याच्या रिलेशनशीपची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. तर दुसरीकडे तमन्ना भाटिया तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेली पाहायला मिळत आहे.

तमन्ना भाटिया लवकरच 'ओडेला 2' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रमोशन दरम्यानचा तमन्ना भाटियाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तमन्ना भाटिया 'विजय'चे नाव ऐकताच लाजताना दिसत आहे. तिने त्यावर प्रतिक्रिया देखील दिली आहे.

'ओडेला २'च्या प्रमोशनला एका पापाराझीने तमन्नाला विचारले की, "तुमच्या आयुष्यात असा कोण व्यक्तिमत्व आहे. ज्याच्यावर तंत्र-मंत्राचा वापर करून तुम्ही विजय प्राप्त करू इच्छिता?" या प्रश्नातून विजयचा अप्रत्यक्ष उल्लेख झाला. 'विजय' शब्द ऐकताच तमन्ना भाटियाच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. ती लाजत लाजत हसली. तसेच मोठा आरडाओरडा देखील करण्यात आला.

पापाराझीने विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देत तमन्ना म्हणाली, "मी तुमच्यावरच नियंत्रण मिळवू इच्छिते. तुम्हाला वशमध्ये केल्यावर सर्व पापाराझी माझ्या मुठीत असतील. तर मग करूया का?" तमन्नाने पापाराझीची फिरकी घेतली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावर कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे.

Tamannaah Bhatia video
सासू -सुनेचा खेळ पुन्हा रंगणार; Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi 2 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, तुलसीच्या भूमिकेत कोण?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com