The Bads Of Bollywood 2: आर्यन खानची दिग्दर्शक म्हणून पहिली वेब सिरीज "द बॅड्स ऑफ बॉलीवूड" ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे. या सिरीजमध्ये एक आकर्षक ट्विस्ट, असंख्य कॅमिओ, २६ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या बॉबी देओलच्या "गुप्त" चित्रपटचं कनेक्शन, ड्रग्ज घोटाळ्यावर एक खोडसाळपणा आणि बरेच काही आहे. या शोमधील आर्यन खानच्या दिग्दर्शनाला खूप प्रशंसा मिळाली आहे. हा शो सात भागांचा असून एका उत्तम क्लायमॅक्ससह संपला. आता, चाहते पुढील सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत. शोचे पात्र, जार्ज सक्सेना म्हणजेच रजत बेदीने या मालिकेच्या दुसऱ्या भागाबद्दल एक खुलासा केला आहे.
अनेक वर्षांपासून पडद्यापासून दूर असलेल्या रजत बेदीने या शोद्वारे जोरदार पुनरागमन केले आहे. तो या सिरीजमध्ये जार्ज सक्सेना या अभिनेत्याची भूमिका साकारत आहे. त्याला आता कोणताही चित्रपट मिळत नसून अजूनही हार मानत नाही आणि निर्मात्यांचा पाठलाग करत पुन्हा काम मिळण्याची विनंती करतो.
दुसऱ्या सीझनवर काम सुरू आहे...
रजत बेदी यांनी न्यूज१८ शोशी बोलताना खुलासा केला की, "हो, दुसरा सीझन बनवला जात आहे. त्यावर काम सुरू आहे. मला आशा आहे की प्रेक्षकांना दुसऱ्या सीझनमध्ये जास्त मज्जा येईल आणि या सीझनपेक्षा जास्त प्रेम दुसऱ्या सीझनला मिळेल.
आर्यनच्या शोची कास्ट
या शोमध्ये लक्ष्य लालवानी, सहेर बंबा, अन्या सिंग, राघव जुयाल, बॉबी देओल, करण जोहर, मोना सिंग, गौतमी कपूर, मनीष चौरसिया आणि मनोज पाहवा हे कलाकार आहेत. शाहरुख खान, रणवीर सिंग आणि इमरान हाश्मीसह अनेक सेलिब्रिटींचे कॅमिओ देखील आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.