Jana Nayagan Leak: थलापती विजयला आणखी एक मोठा झटका; प्रदर्शनापूर्वीच 'जन नायकन' ऑनलाईन लीक

Jana Nayagan Leak: विजयचा चित्रपट 'जन नायकन' सेन्सॉर प्रमाणपत्राच्या प्रतीक्षेत आहे. पण, या चित्रपटाची HD प्रिंट असलेला पायरेटेड चित्रपट ऑनलाईन लीक झाल्याचे वृत्त येत आहे.
Thalapathy Vijay Payment For Jana Nayagan
Thalapathy VijaySAAM TV
Published On

Jana Nayagan Leak: दक्षिण भारतीय सुपरस्टार थलापती विजय यांच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.विजय यांच्या बहुप्रतिक्षित चित्रपट ‘जन नायकन’ (Jan Nayagan) प्रदर्शित होण्यापूर्वीच पायरसीचा बळी ठरला आहे. या चित्रपटातील काही महत्त्वाची सीन ऑनलाइन लीक झाल्यामुळे चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटातील सुमारे १० मिनिटांचे फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या क्लिप्समध्ये चित्रपटातील काही महत्त्वाचे सीन असल्याचे सांगितले जात आहे. काही सोशल मीडिया युजर्सनी तर संपूर्ण चित्रपटच लीक झाल्याचा दावा देखील केला आहे. या घटनेमुळे निर्माते आणि कलाकारांमध्ये चिंता वाढली आहे.

Thalapathy Vijay Payment For Jana Nayagan
Bollywood Actress: प्रसिद्ध अभिनेत्रीचं सोशल मीडिया अकाऊंट हॅक; स्वत: पोस्ट करून चाहत्यांना दिली माहिती

चित्रपटाचे दिग्दर्शक एच. विनोद यांनी या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले, “चित्रपटातील प्रत्येक सीन हे कोणाच्या तरी मेहनतीचे आणि स्वप्नांचे फलित असते. ते अधिकृत प्रदर्शनापूर्वीच लीक होणे अत्यंत वेदनादायक आहे.” त्यांनी चाहत्यांना पायरसीला समर्थन न देण्याचे आवाहन केले.

Thalapathy Vijay Payment For Jana Nayagan
Raja Shivaji Song: 'लाख मराठ्यांची तू आग रे…! 'राजा शिवाजी'च्या पहिल्या गाण्याने अंगावर काटा; अजय-अतुलचा BTS व्हिडिओ पाहाच

तसेच, निर्माते धनंजयन गोविंद यांनीही या घटनेचा निषेध करत तातडीने कारवाई करण्याची गरज व्यक्त केली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, चित्रपटातील महत्त्वाच्या सीन जसे की हिरोची एन्ट्री आणि क्लायमॅक्स लीक होणे हा चित्रपटासाठी मोठा धक्का आहे. या लीकमुळे आधीच सेन्सॉरशी संबंधित अडचणींचा सामना करणाऱ्या ‘जन नायकन’समोर नवे संकट उभे राहिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com