Raja Shivaji Song: 'लाख मराठ्यांची तू आग रे…! 'राजा शिवाजी'च्या पहिल्या गाण्याने अंगावर काटा; अजय-अतुलचा BTS व्हिडिओ पाहाच

Raja Shivaji Song: ‘राजा शिवाजी’ चित्रपटातील ‘छत्रपती’ गाण्याचा BTS व्हिडिओ व्हायरल होत आहे. अजय–अतुल यांच्या दमदार संगीतामुळे चाहत्यांची उत्सुकता वाढली असून चित्रपट १ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.
Raja Shivaji Song
Raja Shivaji SongSaam Tv
Published On

Raja Shivaji Song: मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनित ‘राजा शिवाजी’ या बहुप्रतिक्षित ऐतिहासिक चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटातील ‘छत्रपती’ या दमदार गाण्याचा बिहाइंड द सीन (BTS) व्हिडिओ नुकताच समोर आला असून, सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये गाण्याच्या निर्मिती मागील मेहनत आणि भव्यता स्पष्टपणे दिसून येते. विशेष म्हणजे, हे गाणं प्रसिद्ध संगीतकार जोडी अजय–अतुल यांनी संगीतबद्ध केले असून त्यांनीच ते आपल्या दमदार आवाजात सादर केले आहे. गाण्यातील प्रत्येक बीट, प्रत्येक स्वर आणि कोरस टीमची मेहनत BTS व्हिडिओमधून प्रकर्षाने जाणवते. हे गाणं ऐकताच अंगावर काटा येतो, अशा प्रतिक्रिया चाहत्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत.

Raja Shivaji Song
Bollywood Actress: प्रसिद्ध अभिनेत्रीचं सोशल मीडिया अकाऊंट हॅक; स्वत: पोस्ट करून चाहत्यांना दिली माहिती

रितेश देशमुखने हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यामध्ये संगीतकारांची तालीम, या अजय- अतुलने या गाण्यासाठी घेतलेली मेहनत स्पष्टपणे दिसत आहे या व्हिडिओवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी अजय-अतुल यांचा मानाचा मुजरा! असे कॅप्शन देण्यात आले आहे.

Raja Shivaji Song
Ranveer Singh: रणवीर सिंगच्या अडचणी संपेना; आता हायकोर्टाकडून नवा आदेश, नेमकं काय घडलं?

या व्हिडिओवर अनेक चाहत्यांनी कमेंट करत कौतुक केले आहे. एकाने लिहीले,अजय अतुल फक्त नाव नाही तर एक चमत्कार आहेत. पहिल्याच शब्दाला अंगावर काटा आला हीच जादू आहे त्यांची. आणखी एकाने लिहीले, आईभवानीच्या चरणी प्रार्थना करतो की महाराजांच्या जीवनावर आधारीत चित्रपटाला खूप मोठ्या प्रमाणात यश मिळो. तर आणखी एकाने लिहीले, याच साठी मराठी रसिकांकडून अट्टाहास केला जातो कि शिवरायांचा चित्रपटाचे संगीत अजय- अतुल यांनीच द्यावे.

‘छत्रपती’ हे गाणं १३ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार असून, हिंदवी स्वराज्याची प्रेरणादायी गाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या गाण्यातून करण्यात आला आहे. दरम्यान, ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट १ मे २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित हा भव्य ऐतिहासिक चित्रपट मराठीसोबतच हिंदी भाषेतही प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, जिनिलिया देशमुख यांसारख्या दिग्गज कलाकारांच्या भूमिका आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com