Thalapathy Vijay: तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आणि राजकारणी थलपती विजय सध्या मोठ्या दुःखातून जात असल्याचे समोर आले आहे. ज्येष्ठ चित्रपट निर्माते आर. बी. चौधरी यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण साऊथ इंडस्ट्री शोकाकुल झाली असून विजयही यामुळे खूपच भावूक झाला आहे.
माहितीनुसार, 5 मे 2026 रोजी राजस्थानमध्ये झालेल्या भीषण कार अपघातात चौधरी यांचे निधन झाले. आर. बी. चौधरी हे साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील मोठे नाव होते आणि त्यांनी अनेक कलाकारांना संधी देत उद्योगाला दिशा दिली होती.
विजय आणि चौधरी यांच्यात खास नातं होतं. चौधरी यांनी विजयच्या कारकिर्दीत महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे त्यांच्या निधनाची बातमी कळताच विजय थेट त्यांच्या निवासस्थानी पोहोचला आणि अंत्यदर्शन घेतलं.
या वेळी घडलेला एक भावुक क्षण सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चौधरी यांचा मुलगा आणि अभिनेता जीवा याला विजयने मिठी मारून धीर दिला. या वेळी विजयच्या डोळ्यांत अश्रू होते आणि तो खूपच खचलेला दिसत होता. विजयने पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करत आपल्या भावना व्यक्त केल्या. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर चाहत्यांनीही मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी हा क्षण अत्यंत हृदयस्पर्शी असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, चौधरी यांच्या निधनानंतर संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीतून शोक व्यक्त करण्यात येत आहे. अनेक दिग्गज कलाकारांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे. थलपती विजयच्या राजकीय यशाच्या जल्लोषात असतानाच या दुःखद घटनेमुळे आनंदाचे वातावरण काही क्षणातच शोकात बदलले. विजयने दिलेला हा भावुक निरोप सध्या सर्वांच्या मनाला चटका लावून गेला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.