Famous Actor Death: ज्येष्ठ अभिनेते काळाच्या पडद्याआड; राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास, मनोरंजन विश्वावर शोककळा

Famous Actor Death: प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते यांचे ८१ व्या वर्षी निधन झाले. त्यांनी अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. त्यांच्या जाण्याने मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे.
Veteran Actor Beau Starr passes away
Veteran Actor Beau Starr passes awaySaam Tv
Published On

Famous Actor Death: हॉलिवूडमधील प्रसिद्ध आणि अनुभवी अभिनेते ब्यू स्टार यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांनी २४ एप्रिल २०२६ रोजी कॅनडातील व्हॅन्कुव्हर येथे अखेरचा श्वास घेतला. वृद्धत्वामुळे त्यांच्या निधन झाल्याचे त्यांचा मुलगा आणि अभिनेता माईक स्टार यांनी दिली आहे.

ब्यू स्टार हे विशेषतः गुडफेलस आणि हॅलोवीन या लोकप्रिय चित्रपटांमधील भूमिकांसाठी ओळखले जात होते. ‘हॅलोवीन 4’ आणि ‘हॅलोवीन 5’ मध्ये त्यांनी शेरिफ बेन मीकर्स ही भूमिका साकारली होती. जी प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिली. तसेच मार्टिन स्कॉर्सेस यांच्या ‘गुडफेलस’ या क्लासिक चित्रपटातही त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती.

१९४४ मध्ये न्यूयॉर्कमध्ये जन्मलेल्या ब्यू स्टार यांनी अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी क्रीडा क्षेत्रातही काम केले होते. ते काही काळ न्यू यॉर्क जेट्स च्या सराव संघाचा भाग होते आणि कॅनेडियन फुटबॉल लीगमध्येही ते खेळले होते. त्यानंतर त्यांनी अभिनयाकडे वळत १९८० च्या दशकात कारकीर्द सुरू केली.

Veteran Actor Beau Starr passes away
Actress Father Death: तारक मेहता फेम'दयाबेन'च्या वडिलांचं निधन; अंत्यसंस्कारावेळी अभिनेत्रीने फोडला हंबरडा, VIDEO

चित्रपटांसोबतच त्यांनी अनेक लोकप्रिय टीव्ही मालिकांमध्येही काम केले. ‘Due South’ या मालिकेत त्यांनी लेफ्टनंट हार्डिंग वेल्श ही भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकली. याशिवाय ‘नाईट रायडर’, ‘द ए-टीम’, ‘NYPD ब्लू’ यांसारख्या मालिकांमध्येही त्यांनी काम केले होते.

Veteran Actor Beau Starr passes away
Actor Death: प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन; सिनेविश्वावर शोककळा

त्यांच्या निधनानंतर हॉलिवूडसह चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. सहकलाकार आणि चाहत्यांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या अभिनय कौशल्याचे आणि व्यक्तिमत्त्वाचे कौतुक केले आहे. ब्यू स्टार यांनी आपल्या कारकिर्दीत विविध भूमिका साकारत मनोरंजन क्षेत्रात महत्त्वाचे योगदान दिले.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com