Actress Father Death: तारक मेहता फेम'दयाबेन'च्या वडिलांचं निधन; अंत्यसंस्कारावेळी अभिनेत्रीने फोडला हंबरडा, VIDEO

Actress Father Death: ज्येष्ठ अभिनेते भीम वाकानी यांचे ७ एप्रिल रोजी निधन झाले. तारक मेहता का उल्टा चष्मा मधील दयाबेन म्हणून ओळखली जाणारी दिशा वाकाणी हिचे वडील होते. त्याच्या अंत्यसंस्काराचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
Dayaben Disha Vakani Cry Bitterly At Father Bhim Vakani Funeral
Dayaben Disha Vakani Cry Bitterly At Father Bhim Vakani Funeral Saam Tv
Published On

Actress Father Death: ज्येष्ठ अभिनेते भीम वकानी यांचे ७ एप्रिल रोजी निधन झाले. संपूर्ण टेलिव्हिजन इंडस्ट्री त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत आहे. ते 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेतील कलाकार दयाबेन म्हणजेच दिशा वकानी आणि सुंदर म्हणजेच मयूर वकानी यांचे वडील होते. त्यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबीयांना आणि मित्रांना मोठा धक्का बसला असून त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप कळले नाही. दरम्यान, त्यांच्या अंत्यविधीदरम्यान अभिनेत्री दिशा वकानी ढसाढसा रडताना दिसत आहेत. भीम वकानी यांच्या अंत्यविधीदरम्यानचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

भीम वकानी काही काळापासून आजारी होते. दिशा वकानी आणि त्यांचे कुटुंब सध्या दुःखात असून, या कठीण काळात त्यांनी वैयक्तिक शोकसंवेदना व्यक्त न करण्याचा निर्णय घेतला आहे. टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील अनेक व्यक्तींनी वकानी कुटुंबाप्रती आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. भीम वकानी यांच्या अंत्यविधी वेळी दिशा आणि मयूर आपल्या वडिलांना अखेरचा निरोप देताना दिसले.

Dayaben Disha Vakani Cry Bitterly At Father Bhim Vakani Funeral
Shivali Parab: हॉटनेसचा कहर; कल्याणच्या चुलबुलीचा ऑस्ट्रेलियन बोल्ड लूक

वडिलांच्या अंत्यविधीच्या वेळी दयाबेनला अश्रू अनावर

अंत्यविधीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडिओमध्ये, दिशा वकानी वडिलांना अखेरचा निरोप देताना ढसाढसा रडताना दिसत आहे. अंत्यविधीदरम्यान तिच्या डोळ्यात अश्रू स्पष्टपणे दिसत होते. तिने चेहऱ्यावर मास्क लावला होता आणि डोक्यावर स्कार्फ बांधला होता. व्हिडिओमध्ये ती तिच्या नातेवाईक आणि कुटुंबीयांसोबत दिसत आहे. यावेळी तिचा भाऊ, मयूर, देखील पूर्णपणे खचलेला दिसत आहे.

Dayaben Disha Vakani Cry Bitterly At Father Bhim Vakani Funeral
Dhurandhar 2 Leak Online: बॉक्स ऑफिसवर गाजणारा 'धुरंधर २' ऑनलाइन लीक; रणवीर सिंगकडून संताप, महाराष्ट्र सायबरकडून मोठी कारवाई

भीम वकानी कोण आहेत?

गुजराती रंगभूमीवरील एक प्रमुख व्यक्तिमत्व असण्यासोबतच, या ज्येष्ठ अभिनेत्याने अनेक लोकप्रिय बॉलिवूड चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिकाही साकारल्या. भीम वकानी अनेक चित्रपटांमधील त्यांच्या सहाय्यक भूमिकांसाठी ओळखले जात होते. ते 'तारक मेहता का उल्टा चश्मा'च्या एका भागातही दिसले होते. टेलिव्हिजन व्यतिरिक्त, भीम वकानी यांनी 'हम दिल दे चुके सनम' आणि 'लगान' यांसारख्या अनेक बॉलिवूड ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्येही काम केले. त्याने शाहरुख खान, माधुरी दीक्षित आणि ऐश्वर्या राय यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'देवदास' या चित्रपटातही अभिनय केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com