Dhurandhar 2 Leak Online: बॉक्स ऑफिसवर गाजणारा 'धुरंधर २' ऑनलाइन लीक; रणवीर सिंगकडून संताप, महाराष्ट्र सायबरकडून मोठी कारवाई

Dhurandhar 2 Leak Online: 'धुरंधर २' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरील अनेक रेकॉर्ड ब्रेक करत आहे. पण आता हा चित्रपट ऑनलाइन लीक झाला आहे. त्यामुळे 'महाराष्ट्र सायबर'ने एफआयआर (FIR) दाखल केला आहे.
Dhurandhar 2
Dhurandhar 2 Saam tv
Published On

Dhurandhar 2 Leak Online: बॉलिवूडचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'धुरंधर: द रिव्हेंज' बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई करत आहे. २९ मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आतापर्यंत अनेक मोठे रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. 'सॅकनिल्क' (Sacnilk) च्या माहितीनुसार, या चित्रपटाने जगभरात आतापर्यंत एकूण १,६२५.७२ कोटींची कमाई केली आहे. याव्यतिरिक्त, चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाचेही सर्वत्र कौतुक होत आहे. पण आता हा चित्रपट सोशल मीडियावर लीक झाल्यामुळे आता महाराष्ट्र सायबरकडे एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

कलम ५१ अंतर्गत एफआयआर (FIR) दाखल

चित्रपट सोशल मीडियावर लीक झाल्याप्रकरणी, 'महाराष्ट्र सायबर'ने एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर पोलिसांनी 'कॉपीराइट कायद्या'च्या कलम ५१ अंतर्गत हा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, सायबर सेलने असे स्पष्ट केले की, काही विशिष्ट व्यक्तींनी 'टेलीग्राम'वर (Telegram) एक ग्रुप तयार केला होता. ज्यामध्ये हा चित्रपट लीक करण्यात आला. या ग्रुपचा एडमिन चित्रपट पाहण्यास पैसे घेतो. धुरंधर २ साठी त्याने ५० रुपये घेतले होते.

Dhurandhar 2
Allu Arjun Birthday: अल्लू अर्जुनच्या बर्थडे सेलिब्रेशनला मोठा राडा; पोलिसांचा चाहत्यांवर लाठीचार्ज, VIDEO

'धुरंधर: द रिव्हेंज' हा चित्रपट १९ मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता आणि इतका कालावधी उलटूनही, बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. जरी या चित्रपटाला अनेक वादांचा सामना करावा लागला असला, तरीही त्याच्या कमाईवर किंवा लोकप्रियतेवर कोणताही नकारात्मक परिणाम दिसून आला नाही.

Dhurandhar 2
Amitabh Bachchan: पोलिओची जाहिरात करता, पण मुलाला पायावर उभं केलं नाही; समय रैनाकडून अमिताभ बच्चन यांचा अपमान

आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटात रणवीर सिंग, सारा अर्जुन, संजय दत्त, अर्जुन रामपाल, आर. माधवन आणि राकेश बेदी यांसारख्या दिग्गज कलाकारांचा समावेश आहे. केवळ चित्रपटाची कथाच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली असे नाही, तर त्यातील गाण्यांनीही प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. त्यामुळे हा चित्रपट अभिनय कथा आणि संगीत यामध्ये उत्तम ठरला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com