Allu Arjun Birthday: अल्लू अर्जुनच्या बर्थडे सेलिब्रेशनला मोठा राडा; पोलिसांचा चाहत्यांवर लाठीचार्ज, VIDEO

Allu Arjun Birthday: दक्षिण भारतीय स्टार अल्लू अर्जुन आज, ८ एप्रिल रोजी वाढदिवस आहे. आपल्या लाडक्या अभिनेत्याला शुभेच्छा देण्यासाठी चाहते काल रात्री उशिरा त्याच्या घराबाहेर जमले होते. याच दरम्यान, पोलीस आणि चाहते यांच्यात काहीशी झटापटी झाल्या.
Allu Arjun Birthday
Allu Arjun BirthdaySaam Tv
Published On

Allu Arjun Birthday: प्रसिद्ध दक्षिण भारतीय अभिनेता अल्लू अर्जुनचा आज, ८ एप्रिल रोजी वाढदिवस आहे. अल्लू अर्जुनचा खूप मोठा चाहता वर्ग असून त्याचे चाहते त्याच्या वाढदिवसाची आतुरतेने वाट पाहतात. दरम्यान, त्याच्या चाहत्यांनी ७ एप्रिलच्या रात्रीच, अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी त्याच्या घराबाहेर मोठी गर्दी केली. पण, हा जमाव कालांतराने इतका मोठा झाला की परिस्थिती काहीशी अनियंत्रणा बाहेर गेली म्हणून पोलीसांना लाठीचार्ज करावा लागला.

परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांचा हस्तक्षेप

मंगळवारी रात्री अल्लू अर्जुनच्या घराबाहेर चाहत्यांचा एक मोठा जमाव जमला होता. काही चाहत्यांनी फटाके फोडले, तर काहींनी त्याच्या कल्याणासाठी प्रार्थना केल्या. मात्र, टाइम्स नाऊच्या एका वृत्तानुसार, जमावाची प्रचंड संख्या पाहता परिस्थिती काहीशी हाताळण्यापलीकडे गेली होती.

Allu Arjun Birthday
Bhooth Bangla Trailer Review: नव्या चित्रपटाचा जुना ट्रेलर; अक्षय कुमारच्या 'भूत बंगला'मध्ये 'भागमभाग', 'भूल भुलैया'ची खिचडी

सुरक्षा रक्षक जमावाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत होते. त्यांनी बॅरिकेड्स उभारले आणि लोकांना सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन केले. या प्रयत्नांनंतरही, अनेक चाहते आपल्या उत्साहाच्या भरात पुढे सरसावतच राहिले. परिणामी, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी, पोलिसांना ताकदीचा वापर करावा लागला. त्यांनी काठ्यांच्या साहाय्याने जमावाला मागे हटवण्याचा प्रयत्न केला.

Allu Arjun Birthday
khatron ke khiladi 15: तुफानी स्टंट्स आणि जबरदस्त टास्क; 'खतरों के खिलाडी १५' मध्ये 'या' १२ सेलिब्रिटींची एन्ट्री

अल्लू अर्जुनने व्यक्त केली कृतज्ञता

काही वेळानंतर, आपल्या चाहत्यांना भेटण्यासाठी अल्लू अर्जुन घराबाहेर आला. त्याने त्याच्या चाहत्यांच्या आल्याबद्दल आभार मानले. आपल्या चाहत्यांप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. हा क्षण सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अल्लू अर्जुनबद्दल

८ एप्रिल १९८२ रोजी जन्मलेला अल्लू अर्जुन आज आपला ४३ वा वाढदिवस साजरा करत आहे. २००३ मध्ये गंगोत्री या तेलुगू चित्रपटाद्वारे त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. पुष्पा, आर्या आणि डीजे (DJ) यांसारखे उत्कृष्ट चित्रपट त्याने केले आहेत. लवकरच तो राका (Raka) या आगामी चित्रपटात दिसणार आहे, ज्याचे दिग्दर्शन ॲटली (Atlee) करत आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त राकामधील अल्लू अर्जुनचा फस्ट लूक रिलीज झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com