Famous Actress Divorce : प्रसिद्ध अभिनेत्रीचा संसार मोडला, लग्नाच्या ५ वर्षांनी घेतला घटस्फोट

Actress Divorce Announcement : प्रसिद्ध टिव्हीच्या अभिनेत्रीने लग्नाच्या ५ वर्षांनी घटस्फोट घेतला आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून अभिनेत्रीने ही बातमी दिली.
Actress Divorce Announcement
Famous Actress DivorceSAAM TV
Published On
Summary

टिव्हीचे प्रसिद्ध जोडपे विभक्त

लग्नाच्या ५ वर्षांनी जोडप्याने घेतला घटस्फोट

अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट करून दिली माहिती

टिव्ही इंडस्ट्रीतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्री तन्वी ठक्कर आणि अभिनेता आदित्य कपाडिया यांचा घटस्फोट झाला आहे. अभिनेत्री तन्वी ठक्करने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून ही बातमी चाहत्यांना दिली आहे. अभिनेत्री तन्वी ठक्कर आणि अभिनेता आदित्य कपाडिया यांनी २०२१ मध्ये लग्नगाठ बांधली. आता लग्नाच्या ५ वर्षांनी या जोडप्याचा संसार मोडला आहे.

तन्वी ठक्कर पोस्ट

"गेल्या काही महिन्यांत, माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेकांनी चिंता आणि प्रश्न उपस्थित केले आहेत.

खूप विचार केल्यानंतर, आदित्य आणि मी स्वतंत्रपणे पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे.

आम्हा दोघांसाठी हा एक भावनिक निर्णय आहे, जो एकमेकांबद्दल आणि आमच्या कुटुंबासाठी खूप काळजी, आदर आणि विचारपूर्वक घेतला गेला आहे.

येथे कोणतीही नकारात्मकता किंवा ड्रामा नाही फक्त सामील असलेल्या प्रत्येकासाठी शांती आणि बरे होण्याची आशा आहे.

यावेळी मी मीडिया, मित्र आणि हितचिंतकांना नम्र विनंती करते की, त्यांनी आमच्या गोपनीयतेचा आदर करावा आणि आम्हाला आवश्यक तो वेळ द्यावा.

मी त्यासंबंधीच्या कॉल किंवा प्रश्नांना प्रतिसाद देणार नाही.

तुमच्या समजूतदारपणाबद्दल, दयाळूपणाबद्दल आणि समर्थनाबद्दल धन्यवाद."

वैयक्तिक आयुष्य

तन्वी ठक्कर आणि आदित्य कपाडिया यांची पहिली भेट टिव्ही मालिका 'एक दूर से करते हैं प्यार हम' च्या सेटवर झाली. काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर, त्यांनी २०१३ मध्ये साखरपुडा केला. तन्वी ठक्कर आणि आदित्य कपाडिया यांनी १९ जून रोजी मुलाला जन्म दिला. या प्रसिद्ध जोडप्याच्या घटस्फोटानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

करिअर

तन्वीला 'घुम है किसीके प्यार में' या मालिकेमुळे खूप लोकप्रियता मिळाली. तर आदित्य 'शाका लाका बूम बूम' या शोमुळे प्रसिद्ध झाला.तन्वीने 'बहू हमारी रजनीकांत' या मालिकेतही काम केले आहे. तसेच आदित्यने 'जस्ट मोहब्बत' या शोमध्ये दिसला. आदित्यने हिंदी आणि गुजराती चित्रपटांमध्येही काम केले आहे.

Actress Divorce Announcement
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या 'जलसा' बंगल्यालाही पावसाचा फटका; घरात साचले पाणी, VIDEO व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com