प्रसिद्ध टिव्ही स्टारचे निधन झाले.
अभिनेत्याने वयाच्या ३५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
अभिनेत्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
मनोरंजन विश्वातील एक प्रसिद्ध तारा हरपला. 'The Only Way Is Essex' या रिअॅलिटी टीव्ही शोमधील प्रेक्षकांच्या घराघरात पोहचलेला जेक हॉल (Jake Hall) यांचे निधन झाले आहे. वयाच्या ३५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जेक हॉल हे मॉडेल आणि फॅशन डिझायनर देखील होते. त्यांच्या निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली. तसेच त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
'द सन' च्या वृत्तानुसार, जेक हॉल यांचे एका 'व्हिला पार्टी'मध्ये झालेल्या अपघातानंतर निधन झाले. ज्या वेळी हा अपघात घडला, तेव्हा तो माजोर्का (Majorca) येथील एका व्हिलामध्ये आयोजित पार्टीला उपस्थित होता. कलाकार पार्टीच्या ठिकाणी डोक्याला झालेल्या गंभीर आणि जीवघेण्या जखमांसह आढळला. या जखमा काचेच्या तुकड्यांमुळे झाल्या असाव्यात, असा अंदाज वर्तवला जात आहे. जेक हॉल यांचा मृत्यू डोक्याला झालेल्या दुखापतींमुळे झाला. या प्रकरणाची सध्या पोलीस चौकशी करत आहेत.
जेक हॉलच्या अकाली निधनाची बातमी समजताच, नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर त्याच्याप्रती आपल्या भावना व्यक्त करत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.जेक हॉल हे ६ मे २०२६ रोजी तो मृत अवस्थेत आढळले. त्याच्या पश्चात त्याची ८ वर्षांची मुलगी आहे.जेक हॉल यांनी आपल्या कलेने सर्वांचे मन जिंकले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.