भीषण अपघाताने संसार उद्ध्वस्त; बस-दुचाकीच्या धडकेत नवरा-बायकोचा जागीच मृत्यू

parbhani accident : भीषण अपघाताने जालन्यातील जोडप्याचा संसार उद्ध्वस्त झाला आहे. दुचाकीच्या धडकेत नवरा-बायकोचा जागीच मृत्यू झाला आहे.
parbhani accident news
parbhani accident Saam tv
Published On
Summary

राज्यातील विविध जिल्ह्यात अपघाताची मालिका सुरू

परभणीतील भीषण अपघातात दाम्पत्याचा मृत्यू

भीषण अपघाताने जोडप्याचा संसार उद्ध्वस्त

विशाल शिंदे, सचिन बनसोडे, साम टीव्ही

राज्यात अपघाताच्या मालिका सुरूच आहे. परभणीत भीषण अपघाताची घटना घडली आहे. परभणीच्या मानवतमध्ये शनिवारी दुपारी भीषण अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. भीषण अपघाताने परभणीतील जोडप्याचा संसार उद्ध्वस्त झाला आहे.

परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील यशवाडी शिवारात आज शनिवारी दुपारी भीषण अपघातात झाला. या अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. मानवत-परभणी राष्ट्रीय महामार्ग 61 वरील यशवाडी शिवारात एसटी बस आणि दुचाकीची जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीवरील दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला.

parbhani accident news
Maharashtra News Live Update: वादग्रस्त किशोर महाराज शिवनीकर नवा व्हिडिओ आला समोर

अनिलराव लक्ष्मणराव जाधव (वय 55) आणि त्यांची पत्नी आशामती अनिलराव जाधव वय 50 असे दोघांचे नाव आहे. दोघेही जालन्यातली परतूरमधील खांडवी वाडीत राहायला होते. ते परभणीतील यशवाडी येथे दर्शनासाठी आले होते. दर्शन करून परत जात असताना त्यांच्या दुचाकीला एसटी बसची जोरदार धडक बसली. या अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. तर या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

नगरमध्ये कारच्या धडकेत 12 वर्षीय मुलाचा मृत्यू

अहिल्यानगरमध्ये कारच्या धडकेत 12 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातानंतर संतप्त नातेवाईक मृतदेह घेऊन थेट राहाता पोलिस ठाण्यात हजर झाले. सातवीत शिकणाऱ्या ओंकार दिपक गायकवाड याला गुरुवारी रात्री कारने उडवले.

parbhani accident news
परभणीत घडलं भयानक हत्याकांड; तरुणाची तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या, नातेवाईकांचा आक्रोश

अपघातानंतर प्राथमिक उपाचारानंतर नाशिक येथे उपचारासाठी दाखल केले. परंतु आज शनिवारी ओंकारचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेतील कार पोलिसांच्या ताब्यात आहे. आरोपी मात्र फरार झाला. आरोपीच्या अटकेसाठी नातेवाईक आणि परिसरातील नागरिक आक्रमक झाले. नातेवाईकांनी राहाता पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com