Maharashtra News Live Update:बुलढाण्यात धीरेंद्र शास्त्रींवर गुन्हा दाखल करण्यासाठी पहिली तक्रार; शिवप्रेमी आक्रमक

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates: विदर्भासह महाराष्ट्रात उष्णतेची लाट, विधान परिषदेच्या निवडणुका अपडेट, राज्यातील राजकीय घडामोडी यासह राज्यातील आणि देशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Update:
Maharashtra News Live Update:Saam TV Marathi news

बीड जिल्ह्यात 27 ग्रामपंचायतींच्या 31 सरपंचपदाची मतमोजणी प्रक्रिया पार पडणार  

बीड जिल्ह्यातील 27 ग्रामपंचायतींमधील 31 रिक्त जागांसाठी काल मतदान पार पडली आहे. यामध्ये 12 सरपंच आणि 19 सदस्य पदांचा समावेश आहे बीड जिल्ह्यातील या ग्रामपंचायतींचा निकाल आज हाती येणार यामध्ये विशेष म्हणजे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर मास्साजोग मध्ये देखील पोटनिवडणूक झाली असून या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे

परळीच्या रेल्वे स्टेशन परिसरातून उत्तर प्रदेशातील 13 वर्षांची मुलगी बेपत्ता, शोधकार्य सुरू

बीडच्या परळी वैजनाथ येथील रेल्वे स्थानक परिसरातून उत्तर प्रदेश राज्यातील एक १२ ते १३ वर्ष वयोगटाची मुलगी बेपत्ता झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून रेल्वे पोलीस प्रशासनाकडून तिचा शोध घेतला जात आहे.

Maharashtra News Live Update:बुलढाण्यात धीरेंद्र शास्त्रींवर गुन्हा दाखल करण्यासाठी पहिली तक्रार; शिवप्रेमी आक्रमक

बुलढाणा येथे छत्रपती शिवरायांबाबत कथित अवमानकारक वक्तव्य केल्याच्या आरोपावरून धीरेंद्र शास्त्री यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार नोंदविण्यात आली आहे. आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीशचंद्र रोठे यांनी फिर्यादी म्हणून लेखी तक्रार दाखल केली आहे.

दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी काढण्यात आलेल्या गोदा ते नर्मदा जलयात्रेचे धुळ्यात जल्लोषात स्वागत

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आज धुळे शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रा गोदा ते नर्मदा या यात्रेनिमित्त धुळ्यात आले असता धुळेकरांनी या यात्रेचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले आहे,

राज्याचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गोदा ते नर्मदा जलयात्रा सुरू म्हणत मंत्री विखे पाटील यांनी या यात्रेच्या माध्यमातून दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा संकल्प साकार करण्याचा प्रयत्न असल्याची भावना पाटील यांनी व्यक्त केली आहे,

अकोला 'लव्ह जिहाद'च्या घटनेने हादरलं

नाशिक अमरावतीनंतर आता अकोला 'लव्ह जिहाद'च्या घटनेने हादरलाय.. प्रेमाच्या नावाखाली विवाहित मुस्लिम तरुणाकडून हिंदू मुलीचं अपहरण करीत 5 दिवस घरात डांबून ठेवल्याचा प्रकार समोर आलाय. अखेर खदान पोलिसांकडून तरुणीची सुटका करण्यात आलीय. या घटनेनंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com