Riteish - Raja Shivaji Collection : 'राजा शिवाजी' बॉक्स ऑफिसवर सुसाट; ७० कोटींपार कमाई, ९ व्या दिवशी किती कमावले?

Raja Shivaji Box Office Collection Day 9 : 'राजा शिवाजी' चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. 'राजा शिवाजी' हा रितेश देशमुखचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. चित्रपटाचे एकूण कलेक्शन जाणून घेऊयात.
Raja Shivaji Box Office Collection Day 9
Riteish - Raja Shivaji Collectionsaam tv
Published On
Summary

'राजा शिवाजी' चित्रपट १ मे ला थिएटरमध्ये रिलीज झाला.

'राजा शिवाजी' हिंदी आणि मराठी भाषेत प्रदर्शित झाला.

'राजा शिवाजी' चित्रपटात रितेश भाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली.

रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' चित्रपट १ मे ला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाने दोन आठवड्यात बंपर कमाई केली आहे. 'राजा शिवाजी' चित्रपटातून रितेश देशमुखने छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा दाखवण्यात आली आहे. या ऐतिहासिक चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई सुरू आहे. 'राजा शिवाजी' हा चित्रपट मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित झाला.

'राजा शिवाजी' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस ९

'राजा शिवाजी' चित्रपटगृहांमधील पहिल्या आठवड्याची कमाई जवळपास ५२.६५ कोटी रुपये झाली. Sacnilk च्या रिपोर्टनुसार, ९ व्या दिवशी चित्रपटाने ३९६२ शोजमधून ५.६० कोटी रुपयांची कमाई केली. यापैकी, हिंदी आवृत्तीने १.३५ कोटी रुपये आणि मराठी आवृत्तीने ४.२५ कोटी रुपयांची कमाई केली. आतापर्यंत चित्रपटाचे भारतातील एकूण 'ग्रॉस कलेक्शन' ७२.९१ कोटी रुपयांवर पोहोचले आहे, तर भारतातील एकूण नेट कलेक्शन आता ६१.४५ कोटी रुपये झाले आहे.

'राजा शिवाजी' दिवसानुसार कलेक्शन

  • दिवस १ (हिंदी): ३.३५ कोटी रुपये; (मराठी): ८ कोटी रुपये

  • दिवस २ (हिंदी): ३.४० कोटी रुपये; (मराठी): ७.१५ कोटी रुपये

  • दिवस ३ (हिंदी): ४.२५ कोटी रुपये; (मराठी): ७.७५ कोटी रुपये

  • दिवस ४ (हिंदी): १.३५ कोटी रुपये; (मराठी): ४.२५ कोटी रुपये

  • दिवस ५ (हिंदी): १.५५ कोटी रुपये; (मराठी): ३.३५ कोटी रुपये

  • दिवस ६ (हिंदी): १.२५ कोटी रुपये; (मराठी): ३ कोटी रुपये

  • दिवस ७ (हिंदी): १.२५ कोटी रुपये; (मराठी): २.७५ कोटी रुपये

  • दिवस ८ (हिंदी): ०.७० कोटी रुपये; (मराठी): २.५० कोटी रुपये

  • दिवस ९ (हिंदी): १.३२ कोटी रुपये; (मराठी): ४.२५ कोटी रुपये

  • एकूण: ६१.४५ कोटी रुपये

'राजा शिवाजी' स्टार कास्ट

'राजा शिवाजी' चित्रपटात रितेश देशमुख, जिनिलिया, संजय दत्त, अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते, विद्या बालन हे दिग्गज कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटात जिनिलीया देशमुख सईबाईंच्या भूमिकेत झळकली आहे. महेश मांजरेकरांनी लखुजी जाधव यांची भूमिका साकारली आहे. तर राजमाता जिजाऊंच्या भूमिकेत अभिनेत्री भाग्यश्री झळकली. अभिषेक बच्चन संभाजीराजे शहाजीराजे भोसले यांच्या भूमिका गाजवली. अफजल खानच्या भूमिकेत 'धुरंधर' स्टार संजय दत्त झळकला.

Raja Shivaji Box Office Collection Day 9
Raja Shivaji - Abhishek Bachchan : 'राजा शिवाजी' VFX वरून ट्रोल; अभिषेक बच्चननं दिलं सडेतोड उत्तर, म्हणाला- "रितेश देशमुख..."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com