अभिनेत्री तेजश्री प्रधानचा 61 वर्षीय अभिनेत्यासोबत रोमान्स, टीझरमधील तो सीन बघून आश्चर्यचकित व्हाल, व्हिडिओ व्हायरल
'होणार सून मी ह्या घरची' ते आता 'वीण दोघांतली ही तुटेना' या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली तेजश्री प्रधान आता एका नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विशेष म्हणजे तेजस्वीचे वय 37 वर्ष असून ती तिच्यापेक्षा 25 वर्षांनी मोठ्या असलेले लोकप्रिय अभिनेते अजिंक्य देव यांच्यासोबत रोमान्स करताना दिसणार आहे. Tejashri Pradhan Ajinkya Deo London romance viral video
'आसा मी अशी मी' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून अवघ्या काही वेळातच त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आणि चित्रपट बघण्यासाठी प्रेक्षकांची उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे. दिगदर्शक अमोल शेटगे, निर्मितीकार सचिन नाहर आणि अमोग मलाविया निर्मित आसा मी अशी मी चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. लंडनच्या गुलाबी थंडीमध्ये घडणारी ही प्रेमकहाणी रोमॅंटिक आणि भावनिक आहे. या ट्रेलरमध्ये आपण जर बघितले अभिनेते अजिंक्य रमेश देव एका भारतीय फोटोग्राफरच्या भूमिकेत आहेत. देखणा, स्टायलिश, थोडासा फ्लर्टी, रोमँटिक आणि चार्मिंग वागणारा आहे. त्याचं व्यक्तिमत्त्व मोकळंढाकळं, धडाडीचं आणि जीवनाचा प्रत्येक क्षण पूर्णपणे जगणाऱ्या माणसाचं दाखवलं आहे.
तर दुसरीकडे, अभिनेत्री तेजश्री प्रधान एक परिपक्व, स्थिर आणि स्वतःच्या स्वप्नांनी भारलेली तरुणीचा रोल करताना दिसत आहे. लंडनमध्ये ती स्वतःची ट्रॅव्हल एजन्सी यशस्वीपणे चालवते. या दोन वेगळ्या जगातल्या व्यक्ती जेव्हा एकमेकांच्या जवळ येतात, तेव्हा त्यांच्यात एक सुंदर प्रेमकहाणी आकार घेते. ट्रेलरमध्ये हे नातं जशी उंच भरारी घेतं, तसंच अचानक एक अनपेक्षित वळण ही घेते. तेजश्री अचानक अजिंक्यपासून दूर जाण्याचा निर्णय घेते. तिच्या या निर्णयाच कारण काय? या रहस्यांनीच प्रेक्षकांची उत्सुकता दिवसागणिक वाढत आहे. मात्र ट्रेलरमधील काही रोमॅंटिक सीन बघून अनेकांनी सोशल मीडियावर निरनिराळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
कधी प्रदर्शित होणार?
‘आसा मी अशी मी’ हा चित्रपट अमोल शेटगे यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झाला आहे. अजिंक्य रमेश देव आणि तेजश्री प्रधान यांच्यासह अनेक भारतीय तसेच ब्रिटिश कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. मुख्य कलाकारांसोबतच माधव देवचके, संजय मोने, कृष्णकांत जगन्नाथ केणी आणि यशश्री मसुरकर यांसारखे अनुभवी मराठी कलाकारही आपल्या अभिनयाने चित्रपटात रंगत आणणार आहेत. हा चित्रपट 28 नोव्हेंबर 2025 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.
