Jaitly Files Domestic Violence Case Against Husband
Jaitly Files Domestic Violence Case Against HusbandSaam

धक्कादायक! माजी मिस इंडियाचा घटस्फोट होणार? पतीवर मानसिक - शारीरिक छळाचा आरोप

Jaitly Files Domestic Violence Case Against Husband: अभिनेत्रीनं सेलिना जेटलीनं पती पीटर हागविरोधात घरगुती हिंसाचाराचा आरोप केला आहे. तिनं १० लाख रूपयांची मासिक पोटगीची मागणी केली आहे.
Published on

मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. बॉलिवूड अभिनेत्री सेलिना जेटलीनं मुंबईतील न्यायालयात पती पीटर हागविरूद्ध घरगुती हिंसाचाराचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे. तिनं आरोप केला की, सेलिनाला पतीमुळे भावनिक, शारीरिक, लैंगिक आणि शाब्दिक छळ सहन करावा लागला. सेलिना जेटलीनं पतीवर केलेल्या आरोपांमुळे बॉलिवूड विश्वात खळबळ उडाली आहे.

सेलिना जेटली यांनी दाखल केलेल्या याचिकेवर मंगळवारी न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने या प्रकरणात सेलिनाचे पती पीटर हाग यांना नोटीस बजावली असून, पुढील सुनावणी १२ डिसेंबर रोजी ठेवण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सेलिना जेटलीनं एका नामांकित कायदे फर्ममार्फत ही याचिका दाखल केली आहे.

Jaitly Files Domestic Violence Case Against Husband
राम मंदिरावर भगवा फडकला! अयोध्येत पंतप्रधान मोदींच्या हस्ते ध्वाजारोहण, VIDEO समोर

अभिनेत्री सेलिना जेटली यांनी आपल्या याचिकेच गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, पती पीटर हाग यांनी त्यांचा शारीरिक आणि मानसिक छळ केलाआहे. या सततच्या त्रासामुळे त्यांना ऑस्ट्रियातील घर सोडून भारतात परतण्यास भाग पाडण्यात आले. माजी मिस इंडियाने न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेनुसार, विवाहानंतर पतीनं त्यांना काम करण्यास नकार दिला.

Jaitly Files Domestic Violence Case Against Husband
भाजपमध्ये भूकंप! ५० बड्या नेत्यांचा सामूहिक राजीनामे, कारण काय? नाशिकमध्ये खळबळ

अभिनेत्रीनं दाखल केलेल्या याचिकेनुसार, 'पीटर हाग अत्यंत एकलकोंडे असून, त्यांना रागावर नियंत्रण नाही. तसेच त्यांना मद्यपानाची सवय आहे', पतीच्या या कारणांमुळे सेलिना मानसिक तणावात आयुष्य जगत होती. याचिकेत असेही स्पष्ट करण्यात आले की, 'ऑगस्ट महिन्यांत पीटर हाग यांनी ऑस्ट्रिया न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे'.

दरम्यान, सेलिना जेटलीनं पती पीटर हागकडून ५० नुकसान भरपाई आणि प्रति महिना १० लाख रूपयांची पोटगी देण्याची मागणी केली आहे. तसेच, तीन मुलांना भेटण्याचा अधिकार देण्याचीही मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com