भाजपमध्ये भूकंप! ५० बड्या नेत्यांचा सामूहिक राजीनामे, कारण काय? नाशिकमध्ये खळबळ

BJP Workers Resign Over Seat Sharing Dispute: नाशिकच्या मनमाडमध्ये भाजपला मोठा राजकीय धक्का. ५० पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा राजीनामा. नाराजीमुळे पक्षाला रामराम.
Nashik
NashikSaam tv
Published On
Summary
  • नाशिकच्या मनमाडमध्ये राजकीय घडामोडींना वेग

  • भाजपला जबरदस्त धक्का

  • ५० पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा राजीनामा

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या घोषणा झाल्यापासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. येत्या २ डिसेंबर रोजी नगरपरिषद तसेच नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडतील. या निवडणुकांसाठी सर्वच पक्ष जोमाने तयारीला लागले आहेत. दरम्यान, निवडणुकापूर्वी राज्यात पक्षांतराला वेग आला आहे. अनेक उमेदवार एका पक्षातून दुसरऱ्या पक्षात जाताना दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिकच्या मनमाडमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपच्या सुमारे ५० पदाधिकारी आणि निष्ठावान कार्यकर्त्यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का मानला जात आहे. या घडामोडीनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नाराजीतून त्यांनी पक्षाची साथ सोडली असल्याची माहिती आहे. दरम्यान, आणखी पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजप पक्ष सोडण्याच्या मार्गावर असण्याची शक्यता आहे.

Nashik
१० मिनिटांत सोलून होतील किलोभर वाटाणे, फक्त ६ स्टेप्स; जाणून घ्या स्मार्ट ट्रिक

नाशिकच्या मनमाडमध्ये शिवसेना (शिंदे सेनेची)युती झाली होती. भाजपला १५ ते २० जागा मिळणे अपेक्षित होते. मात्र, केवळ चारच जागा मिळाल्यानं पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी उफाळून आली. मिळालेल्या माहितीनुसार, या ठिकाणी आमदार सुहास कांदे यांच्या नेतृत्वात शिवसेना निवडणूक लढवली जाणार आहे. शिवसेनेचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार असणार आहे. यामुळे भाजपच्या गोटात नाराजी अधिक वाढली आहे.

Nashik
ठाणेकरांनो पाणी जपून वापरा; कोणत्या भागातला पाणीपुरवठा राहणार बंद?

दरम्यान, या विषयी काही भाजप पदाधिकाऱ्यांनी, 'भाजपला पूर्णपणे शिवसेना (शिंदे गटाच्या) खुंटीला बांधून ठेवण्याचा प्रयत्न होत आहे', असा थेट आरोप केला आहे. गेल्या २५ वर्षांपासून मनमाड नगर परिषदेत भाजपचा एकही नगरसेवक निवडून येऊ न शकल्यामुळे पक्ष नेतृत्वाच्या कामगिरीवर स्थानिक पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

Nashik
कोल्हापुरात अवैध गर्भलिंग निदान सेंटरवर छापा, पोलिसांकडून मशीन - गोळ्या जप्त, डॉक्टर फरार

यावेळी भाजप पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी अन्याय आणि पक्षाच्या संघटनात्मक दुर्लक्षाचा आरोपही करण्यात आला आहे. दरम्यान, या सर्व घडामोडींचा निषेध म्हणून भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष यतीन कदम यांच्याकडे सामूहिक राजीनामे सादर केले आहेत. यामुळे मनमाडमधील भाजपची पक्षांतर्गत नाराजी उघडपणे समोर आली असून, यामुळे भाजपला मोठा धक्का मानला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com