Major Crackdown on Illegal Gender Testing Center
Major Crackdown on Illegal Gender Testing CenterSaam

कोल्हापुरात अवैध गर्भलिंग निदान सेंटरवर छापा, पोलिसांकडून मशीन - गोळ्या जप्त, डॉक्टर फरार

Major Crackdown on Illegal Gender Testing Center: कोल्हापुरातील करवीर तालुक्यातील बालिंगा येथील अवैध गर्भलिंग निदान केंद्रावर छापा. डॉक्टर फरार. पोलिसांकडून तपास सुरू.
Published on

रणजित माजगावकर, साम टिव्ही

कोल्हापुरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. कोल्हापुरात अवैध गर्भलिंग निदान प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. करवीर तालु्क्यातील बालिंगा परिसरातील केंद्रात बेकायदेशीर गर्भलिंग निदान सुरू होते. याची माहिती मिळताच या केंद्रावर पोलिसांनी छापा टाकला. या केंद्रावर कोल्हापूर पोलीस आणि जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने संयुक्त छापा टाकला. पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

कोल्हापूर पोलिसांनी केलेल्या कारवाईत गर्भलिंग निदानासाठी वापरली जाणारी मशीन, तसेच संबंधित औषधे आणि गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. दरम्यान, छाप्यानंतर पोलीस आणि आरोग्य अधिकाऱ्यांकडून बालिंगा परिसरात पंचनामा सुरू आहे. तसेच पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Major Crackdown on Illegal Gender Testing Center
हिंदी सिनेसृष्टीचा 'ही मॅन' काळाच्या पडद्याआड; मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली

मिळालेल्या माहितीनुसार, या अवैध रॅकेटशी संबंधित संशयित डॉक्टर सध्या फरार असल्याची माहिती आहे. दरम्यान, पोलिसांच्या तपासात या प्रकरणातील एजंटची नावे देखील समोर आली आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू असून, संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली आहे.

Major Crackdown on Illegal Gender Testing Center
मुलीच्या आत्महत्येनंतर आई वडील खचले, कुटुंबानं आयुष्य संपवलं, सुसाईट नोटमध्ये नेमकं काय लिहिलं होतं?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com