

ठाणेकरांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. ठाण्यात २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील वागळे प्रभाग समिती आणि लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती अंतर्गत इंदिरानगर परिसरात रखडलेला पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी पाईपलाइनचे काम हाती घेण्यात आले आहे.
अलीकडेच 1168 मि.मी. व्यासाची जलवाहिनी टाकण्यात आली असून, ती कार्यान्वित करण्यासाठी इंदिरानगर नाका येथे 750 मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीवर नवीन व्हॉल्व्ह बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. या संपूर्ण कामामुळे एका दिवसासाठी ठाण्यात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
या कामामुळे बुधवारी २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजेपासून गुरूवार, ते २७ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत म्हणजेच एकूण २४ तास पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.
या शटडाऊनमुळे खालील जलकुंभांमधून होणारा पाण्याचा पुरवठा प्रभावित होणार आहे:
इंदिरानगर जलकुंभ
श्रीनगर जलकुंभ
वारलीपाडा जलकुंभ
कैलासनगर रेनो टँक
रुपादेवी जलकुंभ
रुपादेवी रेनो टँक
रामनगर जलकुंभ
येऊर एअर फोर्स जलकुंभ
लोकमान्य जलकुंभ परिसर
संबंधित भागांमध्ये शटडाऊन कालावधीत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील. तसेच पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता ठाणे महानगरपालिकेनं व्यक्त केली आहे. नागरिकांनी पाणी साठवून ठेवून काटकसरीने वापर करावा, तसेच महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.