Siddhi Hande
अभिनेत्री तेजश्री प्रधान ही मराठी मालिका आणि चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे.
तेजश्री प्रधान सध्या वीण दोघांतली ही तुटेना या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
तेजश्री आता लवकरच नवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
तेजश्री प्रधानने आजच सोशल मीडियावरुन नवीन चित्रपटाची घोषणा केली.
तेजश्रीच्या चित्रपटाचं नाव असवामी असं आहे. या चित्रपटाच्या नावाची पाटी हातात घेऊन तिने फोटो पोस्ट केले आहेत.
तेजश्री या चित्रपटात दिया हे पात्र साकारणार आहे. लवकरच या प्रोजेक्टबाबत माहिती समोर येईल, असं तिने सांगितलं आहे.
तेजश्रीच्या या चित्रपटासाठी चाहतेदेखील खूप उत्सुक आहे. तेजश्री खूप दिवसांनी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.
तेजश्रीचे हे फोटो अभिनेता अभिजित खांडकेरने काढले आहेत. त्यामुळे तोदेखील चित्रपटात काम करणार असल्याचे बोलले जात आहे.
Next: तुम्हालाही रोज आयलाइनर लावायला आवडत? तर होऊ शकतात हे वाईट परिणाम, आजपासूनच घ्या काळजी