

मनोरंजन विश्वातून एक मोठी बातमी समोर येत आहे. अभिनेत्री रकुल प्रीत सिंगनं चाहत्यांसाठी एक महत्वाचा संदेश शेअर केला आहे. त्या मेसेजमध्ये रकुलनं, कुणीतरी व्हॅट्सअॅपवर फोटो वापरून लोकांशी संवाद साधत आहे. रकुलनं स्पष्ट केलं की, तो नंबर तिचा नाही. तिनं चाहत्यांना अशा संदेशांना प्रतिसाद देऊ नका आणि नंबर ताबडतोब ब्लॉक करण्याचे आवाहन केले आहे. रकुलच्या पोस्टवरून मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे.
रकुल प्रीत सिंग ही बॉलिवूडमधील सर्वात स्टायलिश अभिनेत्रींपैकी एक आहे. यारियां चित्रपटामुळे अभिनेत्री रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आली. अलिकडेच अभिनेत्रीनं तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक स्टोरी शेअर केली आहे. यातून तिनं चाहत्यांना एक महत्वाचा संदेश लिहिला. सध्या ही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
'सर्वांना नमस्कार. कुणीतरी माझं फेक व्हॉट्सअॅप प्रोफाइल तयार केलं आहे. यातून संबंधित व्यक्ती लोकांशी संवाद साधत आहे. हा नंबर माझा नाही. कृपया अशा लोकांसोबत कुणीही बोलू नका. तसेच नंबर ब्लॉक करा'. रकुलनं पोस्टसोबत फेक व्हॅाट्सअॅप अकाउंटचा स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे. सध्या रकुलची ही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
ही घटना काही नवीन नाही. अभिनेता आणि अभिनेत्री अशा गोष्टींना बळी पडतात. अलिकडच्या काळात अशा सायबर फसवणुकीला अनेक सेलिब्रिटी बळी पडले आहेत. काही दिवसांपूर्वी आदिती राव हैदरी यांनी उघड केले की, कुणीतरी तिचा फोटो वापरून लोकांशी संपर्क साधत आहे. तसेच फेक फोटोशूटची ऑफर देत आहे. तिनं सर्वांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहनही केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.