Tamannaah Bhatia - Vijay Varma Breakup : तमन्ना-विजयनं एकमेकांचे फोटो केले डिलीट, ब्रेकअपच्या चर्चांना उधाण

Tamannaah-Vijay Breakup Rumors : बॉलिवूड कपल प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि अभिनेता विजय वर्मा यांच्या नात्यात दुरावा आल्याचे बोले जात आहे. यांच्या ब्रेकअपच्या चर्चा सोशल मीडियावर चांगल्याच रंगल्या आहेत.
Tamannaah-Vijay Breakup Rumors
Tamannaah Bhatia - Vijay Varma Breakup SAAM TV
Published On

बॉलिवूड कपल अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia ) आणि अभिनेता विजय वर्मा (Vijay Varma) यांच्यात दुरावा आल्याची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे. ही दोघे एकमेकांना दोन वर्षांपासून डेट करत होते. दोघे कायम एकत्र स्पॉट होत होते. पापाराझींना फोटोंसाठी पोजही द्यायचे. मात्र आता त्यांच्या ब्रेकअप झाल्याची चर्चा सर्वत्र पाहायला मिळत आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांचा ब्रेकअप झाला आहे. आता दोघांनी फक्त मैत्रीचे नाते ठेवले आहे. त्यांनी दोघांनी मिळून हा निर्णय घेतला आहे. 'लस्ट स्टोरीज २' या वेब सीरिजपासून यांच्या अफेरच्या चर्चा रंगल्या होत्या. कालांतराने यांनी ते एकमेकांना डेट करत असल्याचे कबूल केले. 'लस्ट स्टोरीज २' या वेब सीरिजमध्ये त्यांनी खूपच बोल्ड सीन देखील केला आहे.

तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांनी आपले नाते जास्त काळ न लपवून ठेवता. त्यांच्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली होती. गेल्या काही काळ ते दोघे आता लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याची चर्चा देखील सुरू असल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र आता त्यांच्या ब्रेकअपच्या बातमीने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांनी इन्स्टाग्रामवरून दोघांचे एकत्र फोटो डिलीट केले आहे. त्यामुळे ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आले आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, एक आठवड्यापूर्वी तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा वेगळे झाले आहे. त्यांनी प्रेमाचे नाते संपवून मैत्रीचा हात पुढे केला आहे. तमन्ना आणि विजयचा ब्रेकअप एकमेकांच्या सहमतीने झाला आहे. मात्र तमन्ना आणि विजयने अद्याप आपल्या ब्रेकअपवर कोणतेही भाष्य केले नाही.

तमन्ना भाटियाला 'स्त्री २'मधील 'आज की रात' या गाण्यामुळे खूप लोकप्रियता मिळाली आहे. अलिकडेच 29 नोव्हेंबर 2024ला तमन्ना भाटियाचा 'सिकंदर का मुकद्दर' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. तर विजय वर्माची 'IC 814 -द कंदहार हायजॅक' सीरिज खूपच गाजली.

Tamannaah-Vijay Breakup Rumors
Ranya Rao Arrested : सोन्याची तस्करी; आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रसिद्धी अभिनेत्रीला अटक, १४ किलो सोनं जप्त

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com