Ranya Rao Arrested : सोन्याची तस्करी; आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रसिद्धी अभिनेत्रीला अटक, १४ किलो सोनं जप्त

Ranya Rao: प्रसिद्ध अभिनेत्री रान्या रावला विमानतळावर अटक करण्यात आली आहे. तिच्याकडून 14 किलो सोने जप्त करण्यात आले आहे. नेमकं प्रकरण काय, जाणून घेऊयात.
Ranya Rao
Ranya Rao Arrested SAAM TV
Published On

महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) कन्नड चित्रपट अभिनेत्री रान्या रावला (Ranya Rao) बेंगळुरू आंतरराष्ट्रीय एअपोर्टवर अटक केली आहे. तिच्याकडून 14.8 किलो सोने जप्त करण्यात आले आहे. दुबईहून आलेल्या रान्याच्या पट्ट्यात बांधलेल्या 14 किलो सोन्याच्या सळ्या आणि 800 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, रान्या राव पोलीस महासंचालक (पोलीस गृहनिर्माण महामंडळ) रामचंद्र राव यांची मुलगी आहे.

रान्या राव सोमवारी रात्री दुबईहून एमिरेट्सच्या विमानाने परतली. गेल्या 15 दिवसांत ती चार वेळा दुबईला गेल्याने तपास यंत्रणांना तिच्यावर आधीच संशय होता. जेव्हा ती बेंगळुरू विमानतळावर पोहोचली तेव्हा अधिकाऱ्यांनी तिच्यावर बारीक नजर ठेवली आणि तपासात तिच्या कडून सोनं जप्त करण्यात आले. तिने कपड्यांमध्ये काही सोन्याचे बार लपवले होते. अटकेनंतर रान्या रावला न्यायालयात हजर करण्यात आले. तेव्हा तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, रान्या विमानतळावर उतरताच तिने स्वत:ची ओळख कर्नाटक पोलीस महासंचालक (डीजीपी) ची मुलगी म्हणून दिली. रान्याने सरकारी प्रोटोकॉल सेवांचा फायदा घेऊन सुरक्षा तपासणी टाळली. या सेवा आयपीएस अधिकाऱ्यांसाठी असतात. आता डीआरआय अधिकारी यामागे आणखी कोणाचा हात आहे का की हे फक्त रान्या रावच काम आहे, याचा तपास घेत आहे. रान्या राव ही एक अभिनेत्री आहे. तिने सुपरस्टार सुदीपसोबत 2014 मध्ये 'माणिक्य' चित्रपटात काम केले होते. तसेच ती अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये दिसली आहे.

Ranya Rao
Amruta Khanvilkar : बाबो! चंद्रा करणार आयटम साँग, 'चिऊताई' गाण्याची पहिली झलक पाहिलीत का?

रामचंद्र राव काय म्हणाले?

मीडिया रिपोर्टनुसार, रामचंद्र राव यांनी सांगितले की, माझा याच्याशी काही संबंध नाही. रान्याने चार महिन्यांपूर्वी जतीन हुक्करीशी लग्न केले होते. जो शहरातील हाय-एंड पब आणि मायक्रोब्रुअरी डिझाइन करणारा आर्किटेक्ट आहे. लग्नानंतर रान्या आई-वडिलांना भेटायला आली नाही. रान्या आणि तिच्या पतीच्या व्यवसायाबाबत मला किंवा त्यांच्या कुटुंबीयांना काहीही माहिती नाही.

Ranya Rao
Chhaava Box Office Collection: 'छावा'नं 'कल्की : २८९८ एडी'ला टाकलं मागे, लवकरच पार करणार ५०० कोटींचा टप्पा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com