Pakistan: इज्जत घालवली राव! चॅम्पियन्स ट्रॉफीत असं कधीच घडलं नव्हतं; पाकिस्तानच्या नावे लज्जास्पद रेकॉर्डची नोंद

Pakistan Named Unwanted Record: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पाकिस्तानला एकही सामना जिंकता आलेला नाही. दरम्यान पाकिस्तानच्या नावे नकोशा रेकॉर्डची नोंद झालेली आहे.
Pakistan: इज्जत घालवली राव! चॅम्पियन्स ट्रॉफीत असं कधीच घडलं नव्हतं; पाकिस्तानच्या नावे लज्जास्पद रेकॉर्डची नोंद
pakistansaam tv
Published On

पाकिस्तानच्या पदरी भरपूर काही आलं पण झोळी फाटकी निघाली. तब्बल २९ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पहिल्यांदाच आयसीसीची स्पर्धा होस्ट करण्याची संधी मिळाली. मात्र भारतीय संघ पाकिस्तानात खेळण्यासाठी आलाच नाही. भारतीय संघाचे सामने दुबईत सुरू आहेत. याहून वाईट काही असेल, तर यजमानपद मिळालं आणि यजमानांना एकही सामना जिंकता आला नाही.

आधी न्यूझीलंड मग भारत आणि शेवटी पावसापुढे पाकिस्तानला गुडघे टेकावे लागले. पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील शेवटचा सामना पावसामुळे धुतला गेला. या स्पर्धेत पाकिस्तानच्या नावे लज्जास्पद रेकॉर्डची नोंद झाली आहे.

Pakistan: इज्जत घालवली राव! चॅम्पियन्स ट्रॉफीत असं कधीच घडलं नव्हतं; पाकिस्तानच्या नावे लज्जास्पद रेकॉर्डची नोंद
IND vs PAK : पाकिस्तानचं डोकं फिरलंय! म्हणे भारताने जादूटोणा केलाय..११ खेळाडूंसाठी २२ मांत्रिक; चर्चेचा VIDEO व्हायरल

चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिल्याच सामन्यात पाकिस्तान आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात पाकिस्तानला ६० धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर भारतीय संघाने पाकिस्तानचा दुबईत खेळताना ६ गडी राखून पराभव केला.

या दोन्ही सामन्यांमध्ये पाकिस्तानचा संघ गोलंदाजीत, फलंदाजीत आणि क्षेत्ररक्षणातही पिछाडीवर राहिला. दोन्ही सामन्यांमध्ये पराभव झाल्यानंतर स्पर्धेतील तिसरा सामना पावसामुळे रद्द झाला. यजमान पाकिस्तानचा संघ स्पर्धेतून आधीच बाहेर पडला होता. बांगलादेशला हरवून पाकिस्तानसमोर लज्जास्पद रेकॉर्डपासून वाचण्याचं आव्हान होतं.

Pakistan: इज्जत घालवली राव! चॅम्पियन्स ट्रॉफीत असं कधीच घडलं नव्हतं; पाकिस्तानच्या नावे लज्जास्पद रेकॉर्डची नोंद
IND Vs PAK : भारताच्या विजयानंतर, IIT बाबाची फजिती; केली आणखी एक भविष्यवाणी

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या इतिहासात यजमानपद असलेल्या देशाने एकही सामना न जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी कधीच असं घडलं नव्हतं. २००२ नंतर आतापर्यंत ६ वेळेस या स्पर्धेचे आयोजन केले गेले आहे. मात्र आतापर्यंत एकदाही असं घडलेलं नाही. २००२ मध्ये श्रीलंकेकडे यजमानपद होते.

Pakistan: इज्जत घालवली राव! चॅम्पियन्स ट्रॉफीत असं कधीच घडलं नव्हतं; पाकिस्तानच्या नावे लज्जास्पद रेकॉर्डची नोंद
Champions Trophy: रोहित बाहेर, शमीला विश्रांती; IND vs NZ सामन्यात अशी असू शकते भारताची प्लेइंग ११

या स्पर्धेत भारत-श्रीलंका संघाने संयुक्तरित्या यजमानपद भुषवले होते. २००४ मध्ये या स्पर्धेचे यजमानपद इंग्लंडकडे होते. या स्पर्धेतही इंग्लंडने साखळी फेरीतील दोन्ही सामने जिंकले होते. या संघाने फायनल गाठली होती. त्यानंतर फायनलमध्ये वेस्टइंडीजला पराभूत करत जेतेपदाची ट्रॉफी उंचावली होती. २००६ मध्ये या स्पर्धेचे यजमानपद भारतीय संघाकडे होते. या स्पर्धेत भारतीय संघाने ३ पैकी १ सामना जिंकला होता.

त्यानंतर २००९ मध्ये या स्पर्धेचे यजमानपद दक्षिण आफ्रिकेकडे, तर २०१३ मध्ये इंग्लंडकडे आणि २०१७ मध्येही इंग्लंडकडेच होते. या दोन्ही स्पर्धांमध्ये देखील यजमान संघाने सामने जिंकले होते. त्यामुळे पाकिस्तान या स्पर्धेच्या इतिहासातील पहिलाच यजमान संघ ठरला आहे जो संघ एकही सामना न जिंकता स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com