Chhaava Box Office Collection : 'छावा'ची दाक्षिणात्य सिनेमांना टक्कर, बॉक्स ऑफिसवर डरकाळी; किती झालंय कलेक्शन?

Chhaava : वाघाच्या जबड्यात घालुनी हात मोजितो दात ही म्हण छावा चित्रपटाने सार्थ ठरवली आहे. छावाने अगदी दाक्षिणात्य सिनेमाच्याच जबड्यात हात घातलाय. संभाजी महाराजांच्या छावा चित्रपटाने सिनेमाच्या इतिहासात असामान्य पराक्रम गाजवलाय. पाहूयात त्यावरचा विशेष रिपोर्ट
Chhaava box office collection
Chhaava box office collectionSaam Tv
Published On

Chhaava Box Office Collection : छावा चित्रपट म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा. चित्रपटाच्या माध्यमातून शिवरायांच्या छावाची शौर्यगाथा जगभरात पोहोचलीय. संभाजी महाराजांचा इतिहास रुपेरी पडद्यावर पाहून नव्या पिढीचाही ऊर अभिमानाने भरून येतोय. अवघ्या महाराष्ट्रानं त्यांच्या राजाच्या चरित्रगाथेला डोक्यावर घेतलंय. इतिहास जिवंत होऊन अक्षरक्ष: समोर उभा राहतो.

छावा सिनेमा परत परत पाहिला तरीही मन भरत नाही. म्हणूनच प्रेक्षकांनी सिनेमाला छप्परपाड प्रतिसाद दिलाय. थिएटर्स 24 तास सुरु आहेत. तरीही प्रेक्षकांना तिकीटं मिळत नाहीएत. 'हे हिंदवी राज्य व्हावे हीच श्रींची इच्छा' संभाजी महाराजांची ही वाक्य ऐकून उर अभिमानाने भरून येतो. अंगावरचा काटा जात नाही.

प्रेक्षकांच्या मनावर छावाने छाप सोडलीय. चित्रपट संपला तरी डोळ्यातलं पाणी थांबत नाही. या चित्रपटात असे असंख्य सिन्स आहेत जिथे अख्खं थिएटर रडतं. हिंदी सिनेमांच्या ऐतिहासिक चित्रपटांच्या यादीतही छावा सर्वात मोठा ओपनर ठरलाय. छावाने फक्त बॉलीवूड चित्रपटांनाच मागे सोडलं नाहीतर तर अलिकडे प्रदर्शित झालेल्या सर्व दाक्षिणात्य सिनेमांनाही पाणी पाजलंय म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

Chhaava box office collection
Chhaava Movie : छावा चित्रपटातील तो सर्वात 'भारी' सीन कुठे शूट झालाय? महाराष्ट्रातील ११० फूट खोल विहीर कुठंय?

'छावा'ची डरकाळी !

दिवस 1: 33.1 कोटी,

दिवस 2: 39.30 कोटी,

दिवस 3: 49.03 कोटी,

दिवस 4: 24.00 कोटी -

एकूण कमाई: 145.43 कोटी

Chhaava box office collection
Chhaava : छावा पाहिल्यावर माजी क्रिकेटरने व्यक्त केला संताप, 'छत्रपती संभाजी महाराज यांच्या..'

सिनेमासृष्टीत हल्ली दाक्षिणात्य सिनेमांचा बोलबाला होता. साऊथ इंडस्ट्रीमुळे बॉलीवूड सिनेमांनीही बॉक्स ऑफिसवर जवळपास मान टाकली होती.. मात्र छावाने जणू दाक्षिणात्य सिनेमाच्या जबड्यात हात घातलाय. छावाची ही डरकाळी. सिनेमाची छप्परफाड कमाई आता बॉलीवूडसाठी संजीवनी ठरणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Chhaava box office collection
Rashmika Mandanna: 'साऊथ इंडीयन मुलगी महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत...'; अशी झाली रश्मिकाची निवड, अभिनेत्रीची ती पोस्ट चर्चेत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com