Tamanna Bhatia Vijay Varma Video: काय ते प्रेम! पापाराझींसमोर तमन्ना भाटियाने विजय वर्माप्रती व्यक्त केलं प्रेम, कपलचा Cute व्हिडीओ व्हायरल

Tamanna Bhatia Express Love: तमन्ना आणि विजयचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
Tamanna Bhatia and Vijay Varma at OTT India Fest 2023
Tamanna Bhatia and Vijay Varma at OTT India Fest 2023Saam TV
Published On

Tamanna Bhatia Help Vijay Varma:

मुंबईत 'ओटीटी इंडिया फेस्ट २०२३'चे आयोजन करण्यात आले आहे. आज या कार्यक्रमाचा दुसरा दिवस आहे. या फेस्ट बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली आहे. सर्व सेलिब्रिटींनी त्यांच्या कपड्यांवर पिंक रिबीन लावली होती.

ब्रेस्ट कॅन्सरविषयी समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी पिंक रिबीनचा वापर केला जातो. हा कार्यक्रम बांद्रा येथील ताज हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया देखील हजर होते. बॉलिवूडच्या या नवीन कपलची सध्या सर्वत्र चर्चा आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया पापाराझींसमोर पोज देण्यासाठी उभे होते. तेव्हाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तमन्ना खाली वाकून काहीतरी उचलताना दिसत आहे. तमन्ना, विजयच्या पायाजवळ काहीतरी शोधात आहे.

तमन्नाला विजयच्या जॅकेटवरील पिंक रिबीन खाली पडल्याचे लक्षात आले. तिच रिबीन उचलण्यासाठी तमन्ना व्हिडीओमध्ये खाली वाकली होती. तमन्नाने ती पिंक रिबीन उचलली आणि विजयच्या जॅकेटला लावली. त्यानंतर तिने ती रिबीन व्यवस्थित लागली आहे ना याची खात्री केली. तसेच विजयने देखील तमन्नाला विचारून रिबीन पुन्हा पडणार नाही याची खात्री करून घेतली

दोघांमधील हे प्रेम पाहून सगळे त्यांचं कौतुक करत आहेत. तमन्नाने जे केलं ते फार कमी वेळा पाहायला मिळतं. तमन्नाने कसलाही विचार न करता विजयाची केलेली मदत चाहत्यांना आणि पापाराझींना खूप आवडली आहे.

Tamanna Bhatia and Vijay Varma at OTT India Fest 2023
Aboli Serial Update: नवीन आव्हानात्मक भूमिकेसाठी सुयश टिळक सज्ज; अबोली - अंकुशच्या जीवनात येणार नवं वादळ

तमन्ना आणि विजयचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट केल्या आहेत. 'ही जोडी बेस्ट आहे', 'दोघांकडून कसं वागायचं हे शिकायला हवं', 'या दोघांना नजर न लागो' अशा कमेंट नेटकरी करत आहेत.

तमन्ना आणि विजयचा लूक

'ओटीटी इंडिया फेस्ट २०२३'मध्ये तमन्ना आणि विजय कूल लूकमध्ये आले होते. विजयने ब्लॅक पॅन्ट आणि ग्रे टी-शर्ट घातले होते. त्यावर त्याने ब्लॅक जॅकेट आणि ग्रे गॉगल घातला आहे. विजयच्या ब्लॅक जॅकेटवर ग्रे डिझाईन देखील आहे. तमानांच्या लूकविषयी बोलायचं झालं तर, तिने मल्टिकलरचा सॅटिन फ्रॉक घातला आहे. तसचे केसांचा बन बांधला आहे. यावेळी तमन्नाच्या कानातल्यावरून तुमची नजर हटणार नाही. तमन्नाने हार्ट शेपचे गोल्डन कानातले घातले आहेत. (Latest Entertainment News)

Tamanna Bhatia and Vijay Varma at OTT India Fest 2023
Alia Bhatt Wedding Saree: आलिया भटने नॅशनल अ‍ॅवॉर्ड स्वीकारण्यासाठी लग्नातील साडी का नेसली?, चर्चेनंतर अभिनेत्रीने स्वत:च केला खुलासा

विजया वर्मा आणि तमन्ना भाटिया दोघेही ओटीटीवर एकामागून एक प्रोजेक्ट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. तमन्ना एक दाक्षिणात्य चित्रपट पोंगलला प्रदर्शित होणार आहे. तर 'आखरी सच' ही वेबसीरीज काही महिन्यापूर्वी प्रदर्शित झाली आहे.

तमन्ना भाटिया आणि विजय वर्माने नेटफ्लिक्सच्या एक वेबसीरीजमध्ये एकत्र काम केले होते. त्यांनतर त्यांच्या रिलेशनशिपचा खूप चर्चा होत होत्या. अखेर त्यांनी त्यांचे प्रेम सर्वांसमोर मान्य केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com