अभिनेता सुयश टिळक 'का रे दुरावा' या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला. या मालिकेनंतर सुयश टिळकच्या गाडीने वेग घेतला. सुयश अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये झळकला आहे. सुयश चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सुयश आता नवीन मालिकेत दिसणार आहे.
अभिनेता सुयश टिळकने त्याच्या सोशल मीडियवर नवीन भूमिकेतील अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. सुयश टिळक स्टार प्रवाहवरील 'अबोली' या मालिकेत दिसणार आहे. सचित पाटील आणि गौरी कुलकर्णी या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहेत.
'अबोली' या मालिकेची (Serial) कथा सध्या रंजक वळणावर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मालिकेत सचित राजेच्या नावाची खूप चर्चा आहे. अंकुशच सचित राजे असल्याचं मालिकेत भासवलं जात आहे. परंतु सचित राजे मात्र दुसराच कोणीतरी आहे. आता मालिकेत खऱ्या सचित राजेची एन्ट्री होणार आहे. सुयश टिळक सचित राजेची भूमिका साकारणार असून या भूमिकेसाठी तो खूप उत्सुक आहे.
'अबोली' मालिकेतल्या सचित राजे या भूमिकेद्दल सांगताना सुयश म्हणाला, ‘हे पात्र साकारणं खरंच आव्हानात्मक आहे. मालिकेत वेगवेगळी रुपं मी घेणार आहे. कधी मी स्त्रीवेशात असेन तर कधी वृद्धाच्या रुपात. कधी रिक्षावाला असेन तर कधी कडक लक्ष्मीच्या रुपात. अभिनेता म्हणून हे सगळं साकारताना माझी कसोटी लागतेय.
एरवी मला तयार होण्यासाठी फार वेळ लागत नाही. मात्र ही वेगवेगळी रुपं साकारण्यासाठी तयार होताना बरीच मेहतन घ्यावी लागतेय. मी आवजर ज्या भूमिका साकारल्या आहेत त्यापेक्षा वेगळी आणि हटके अशी ही व्यक्तिरेखा आहे. स्टार प्रवाह वाहिनीसोबत मी बऱ्याच मालिका केल्या आहेत. पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या नंबर वन वाहिनीसोबत जोडला जातोय याचा आनंद आहे.' (Celebrity)
सुयश टिळकने त्याच्या इंस्टाग्राम ही सगळी रूपं शेअर केली आहेत. स्टार प्रवाह वाहिनीने त्यांच्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये सुशय साकारत असलेल्या पात्राची झलक पाहायला मिळत आहे. सुयश साकारत असलेले पात्र खूप भयंकर असल्याचे यावरून लक्षात येते. सुयश टिळक म्हणजे अबोली मालिकेतील सचित राजेच्या येण्याने अबोली आणि अंकुशच्या जीवनात काय वादळ येणार हे आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे. (Latest Entertainment News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.