बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) सध्या तिला मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्कारामुळे (National Film Award) चांगलीच चर्चेत आहे. आलियाला 'गंगूबाई काठियावाडी' (gangubai kathiawadi) या चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आलं.
आलियासाठी कालचा दिवस खूपच खास होता. आलिया भटने नॅशनल अॅवॉर्ड स्वीकारण्यासाठी लग्नातील साडी नेसली होती. तिच्या या साडीची देखील चांगलीच चर्चा रंगली. या सर्व चर्चांनंतर आलिया भटने लग्नातील साडी नेसण्यामागचे कारण सांगितले आहे.
नुकताच आलिया भटने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवर राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यावेळी नेसलेल्या साडीतील फोटो पोस्ट केला. हा फोटो पोस्ट करत आलियाने नॅशनल अॅवॉर्ड स्वीकारण्यासाठी लग्नातील साडी का नेसली यामागचे कारण सांगितले आहे. अभिनेत्रीने या पोस्टमध्ये असेही लिहिले की, 'खास दिवसासाठी खास पोशाख असावा. आणि काहीवेळा तो पोशाख आधीपासूनच आपल्याबरोबर असतो. जे एकदा खास होते ते पुन्हा पुन्हा खास होऊ शकते...' या पोस्टमध्ये आलियाने #rewear #reuse #repeat.. असे हॅशटॅग देखील वापरले आहेत.
राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारण्यासाठी आलेल्या आलिया भटच्या लूककडेच सर्वांचा नजरा खिळल्या होत्या. आलिया भटने तिच्या सुंदर साडी लूकने सर्वांना चकीत केले. आलिया भट तिच्या लग्नातील साडी नेसून राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारण्यासाठी पोहोचली होती. तिने रणबीर कपूसोबत लग्न करताना ही साडी नेसली होती.
आलियाला लग्नाच्या साडीत पाहून प्रत्येकाच्या मनात प्रश्न निर्माण झाला की आलिया लग्नात साडी नेसून का आली आहे? सोशल मीडियावर अशीही चर्चा रंगली होती की आलिया दुसरं काही परिधान करून येऊ शकली नसती का? या सर्व चर्चांवर आलियाने इन्स्टा स्टोरीच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे. तिच्या या इन्स्टा स्टोरीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात आलिया भट्टसोबत अभिनेत्री क्रिती सेनॉनला देखील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. त्याचसोबत साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनला सर्वोत्कृष्ट अभिनेताच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. या पुरस्कार सोहळ्यानंतर आलिया भट्ट, अल्लू अर्जुन, रणबीर कपूर आणि क्रिती सेनॉन यांनी एकत्र फोटो काढले. १७ ऑक्टोबर रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवनात ६९ व्या राष्ट्रीयो चित्रपट पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.