OTT Release This Week: ॲक्शन, ड्रामा अन् रोमान्स... 'या' आठवड्यात सिनेरसिकांना OTT वर पाहायला मिळणार जबरदस्त फिल्म्स अन् वेबसीरिज
OTT Release Film And Web Series This Week
चित्रपट (Movie) आणि वेबसीरीज (Web Series)प्रेमींसाठी ओटीटी प्लॅटफॉर्म हा मनोरंजनाचा उत्तम पर्याय आहे. ओटीटीवर (OTT Platform) प्रत्येक आठवड्याला नवनवीन चित्रपट आणि वेब सीरीजच्या प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. सध्या ऑक्टोबर महिन्यामध्ये ओटीटीवर अनेक वेगवेगळ्या धाटणीच्या कलाकृती प्रदर्शित झाल्या आहेत. ऑक्टोबर महिना सिनेप्रेमींसाठी हा आठवडा खूपच खास असणार आहे.
या महिन्यामध्ये ओटीटीवर अनेक हॉरर, कॉमेडी अशा पद्धतीचे चित्रपट प्रदर्शित होत आहेत. एकंदरीत या आठवड्यामध्ये प्रेक्षकांना त्यांच्या आवडीनुसार ॲक्शन, ड्रामा, रोमान्स आणि कॉमेडी पाहायला मिळणार आहे. चला तर जाणून घेऊया या आठवड्यामध्ये प्रदर्शित होणाऱ्या चित्रपट आणि वेबसीरीजबद्दल...
काला पानी
अंदमान आणि निकोबार बेटाच्या काळ्या पाण्यामध्ये तिथले नागरिक कसे राहतात हे 'काला पानी' या वेबसीरीजमध्ये पाहायला मिळणार आहे. मोना सिंह आणि आशुतोष गोवारीकर यांचीही वेबसीरीज नेटफ्लिक्सवर १८ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.
पर्मनंट रूममेट्स
'पर्मनंट रूममेट्स' चा तिसरा सीझन ॲमेझॉन प्राईम व्हिडीओ या ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. रोमँटिक वेबसीरीज असलेल्या वेबसीरीजमध्ये नात्यातील चढ-उतार दाखवण्यात आले आहे. ॲमेझॉन प्राईम व्हिडीओवर ही वेबसीरीज १८ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. (Web Series)
एलीट ८
'एलिट'च्या सातही सिझनला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. नुकताच नेटफ्लिक्सवर 'एलिट'चा आठवा सीझन प्रदर्शित होणार आहे. येत्या २० ऑक्टोबरला नेटफ्लिक्सवर 'एलीट ८' ही सीरिज प्रदर्शित होणार आहे. (OTT)
अपलोड सीझन 3
'अपलोड सीझन 3' ही विनोद आणि नाट्य असलेली सीरिज येत्या २० ऑक्टोबरला ॲमेझॉन प्राइम व्हिडीओवर रिलीज होणार आहे. 'अपलोड सीझन 3' या सीरिजमध्ये एका व्यक्तीच्या मृत्यूनंतरची गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
दूना
ली जियोंग दिग्दर्शित 'दूना' ही सीरिज २० ऑक्टोबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
क्रिएचर
'क्रिएचर' चित्रपटामध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका मुलीची कथा पाहायला मिळणार असून २० ऑक्टोबरला नेटफ्लिक्सवर चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.