Suhana Khan Luxury Watch Price
Suhana KhanSAAM TV

Suhana Khan : 'केसरी 2'च्या प्रीमियरला शाहरुखच्या लेकीचा बोलबाला; लग्जरी घड्याळाने वेधलं लक्ष, किंमत वाचून पायाखालची जमीन सरकेल

Suhana Khan Luxury Watch Price: शाहरुख खानची लेक सुहाना खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यात तिच्या लग्जरी घड्याळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
Published on

सध्या बॉक्स ऑफिसवर 'केसरी २' (kesari 2) चित्रपटाची चर्चा पाहायला मिळत आहे. हा चित्रपट 18 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाचा प्रिमियर सोहळ्यात धमाकेदार पद्धतीने पार पडला. या प्रिमियर सोहळ्याला बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती. यात बॉलिवूडच्या किंग खानच्या लेकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शाहरुख खानची लेक सुहाना खान (Suhana Khan) देखील या सोहळ्याला आली होती.

'केसरी २' चित्रपटाच्या प्रिमियरला सुहाना खान एका स्टायलिश लूकमध्ये स्पॉट झाली. तिने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. मोकळे केस आणि मिनिमल मेकअप आणि ज्वेलरीने तिचा लूक खुलला आहे. तिने हाय हिल्स आणि सोबत काळ्या रंगाची बॅग कॅरी केली आहे. तसेच तिने लग्जरी वॉच परिधान केले आहे. या वॉचने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या घड्याळाची किंमत कोटींच्या घरात आहे.

सुहाना खानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तिने काळ्या आणि गोल्डन रंगाचे घड्याळ परिधान केले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सुहाना खानचे लग्जरी वॉच रिव्हर्सो ट्रिब्युट नॉनंटीम ​​'एनॅमल' आहे. ज्याची किंमत 1.4 कोटी आहे. तिच्या या लूकचा फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

'केसरी २' चित्रपटात अक्षय कुमारसोबत आर माधवन आणि अनन्या पांडे देखील पाहायला मिळत आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी 7.50 कोटींची कमाई केली आहे. 'केसरी चॅप्टर 2' मधून जालियनवाला बाग हत्याकांड या प्रकरणाचा उलगडा पाहायला मिळत आहे. 'केसरी चॅप्टर 2'मध्ये अक्षय कुमार सी. शंकरन नायर यांची भूमिका साकारत आहेत. जे वकिल होते. अनन्या पांडे युवा वकील दिलरीत गिलच्या भूमिकेत दिसणार आहे. 'केसरी चॅप्टर 2' चित्रपटाचे दिग्दर्शन करण सिंग यांनी केले आहे.

Suhana Khan Luxury Watch Price
Lai Avadtes Tu Mala : 'लय आवडतेस तू मला' मालिकेत नव्या पात्रांची एन्ट्री, सरकार-सानिकाच्या आयुष्यात येणार वादळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com