Gharoghari Matichya Chuli: घरोघरी मातीच्या चुली मालिकेत धमाकेदार ट्विस्ट; मायाची केस लढण्यासाठी गीतांजली सरंजामेची होणार एण्ट्री

Gharoghari Matichya Chuli: ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत स्मिता शेवाळेची वकील म्हणून दमदार एंट्री. कोर्टरूम ड्रामामुळे कथानकाला नवे वळण मिळणार आहे. यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
Gharoghari Matichya Chuli
Gharoghari Matichya ChuliSaam tv
Published On

Gharoghari Matichya Chuli: स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका 'घरोघरी मातीच्या चुली' सध्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. रणदिवे कुटुंबाला वेठीस धरणाऱ्या मायाचं खरं रूप समोर आल्यानंतर कथेत आणखी एक नाट्यमय वळण आले आहे त्यामुळे आता प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

जानकी, ऐश्वर्या आणि अवंतिका या तिन्ही सुनांनी आता मायाविरोधात उघडपणे लढा देण्याचा निर्णय घेतला आहे. या संघर्षाला आता कायदेशीर वळण मिळणार असून, मालिकेत दमदार कोर्टरूम ड्रामा पाहायला मिळणार आहे. याच पार्श्वभूमीवर मालिकेत एका नव्या आणि प्रभावी पात्राची एंट्री होत आहे.

Gharoghari Matichya Chuli
Allu Arjun Birthday: अल्लू अर्जुनच्या बर्थडे सेलिब्रेशनला मोठा राडा; पोलिसांचा चाहत्यांवर लाठीचार्ज, VIDEO

सुप्रसिद्ध अभिनेत्री स्मिता शेवाळे आता या मालिकेत नामांकित वकील गीतांजली सरंजामेची भूमिका साकारणार आहेत. गीतांजली ही अत्यंत बुद्धिमान, आत्मविश्वासू आणि निष्णात वकील म्हणून ओळखली जाते. विशेष म्हणजे, तिच्या कारकिर्दीत तिने एकही केस गमावलेली नाही, त्यामुळे कोर्टात तिची उपस्थिती म्हणजे प्रतिस्पर्ध्यांसाठी मोठं आव्हान ठरणार आहे.

Gharoghari Matichya Chuli
Dhurandhar 2 Leak Online: बॉक्स ऑफिसवर गाजणारा 'धुरंधर २' ऑनलाइन लीक; रणवीर सिंगकडून संताप, महाराष्ट्र सायबरकडून मोठी कारवाई

मायाच्या बाजूने केस लढण्यासाठी गीतांजली सरंजामे रणांगणात उतरणार असून, जानकीची बाजू लढवणाऱ्या अवंतिकासोबत तिचा थरारक सामना रंगणार आहे. या कोर्टरूम ड्रामामध्ये नेमका विजय कुणाचा होणार, याबाबत प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

दरम्यान, 'घरोघरी मातीच्या चुली' ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून, तिच्या प्रत्येक भागाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आता कोर्टरूम ड्रामामुळे मालिकेची रंगत आणखी वाढणार आहे. या रोमांचक घडामोडी पाहण्यासाठी ही मालिका दररोज रात्री १०.३० वाजता स्टार प्रवाहवर प्रेक्षकांच्या भेटीस येते.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com