Samantha Ruth Prabhu : ३९व्या वर्षी सामंथा रुथ प्रभु आई होणार? 'त्या' व्हायरल VIDEO ने सुरू झाली चर्चा

Samantha Ruth Prabhu Pregnancy : साऊथची अभिनेत्री सामंथा रुथ प्रभु लवकरच आई होणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. तिचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात बेबी बंप दिसत आहे.
Samantha Ruth Prabhu Pregnancy
Samantha Ruth Prabhusaam tv
Published On
Summary

सामंथा रुथ प्रभुचा नुकताच 'मा इंति बंगारम' हा चित्रपट रिलीज

सामंथा रुथ प्रभु आई होणार असल्याची चर्चा रंगली

सामंथाच्या व्हायरल व्हिडीओत बेबी बंप दिसत आहे

साऊथची क्वीन सामंथा रुथ प्रभुचा नुकताच 'मा इंति बंगारम' हा चित्रपट रिलीज झाला आहे. हा चित्रपट जगभरात बक्कळ कमाई करताना दिसत आहे. तर दुसरीकडे सामंथा नुकतीच आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर सामंथाचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामुळे अभिनेत्री गरोदर असल्याची चर्चा रंगली आहे. नुकतीच सामंथाने पती राज आणि चित्रपटाच्या टीमसोबत 'मा इंति बंगारम' च्या यशाचा आनंद साजरा करताना दिसली. या क्षणाचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत.

व्हायरल व्हिडीओत सर्वांचे लक्ष सामंथा रुथ प्रभुच्या बेबी बंपकडे गेले. सामंथाने फिकट निळ्या रंगाचा टी-शर्ट आणि जीन्स परिधान केली होती. गर्दीत राज तिची काळजी घेताना दिसला. ती टीम आणि आपल्या नवऱ्यासोबत केक कापताना दिसत आहे. लग्नाच्या ६-७ महिन्यानंतर सामंथाच्या घरात पाळणा हलणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र अद्याप दोघांनीही कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही.

सामंथा रुथ प्रभुच्या या व्हायरल व्हिडीओवर चाहते कमेंट्सचा आणि शुभेच्छांचा वर्षाव करत आहे. सामंथाच्या चाहत्यांना खूपच आनंद होत आहे. प्रेक्षक दोघांच्या जोडीच कौतुकही करत आहे. सामंथा रुथ प्रभुने 2025 मध्ये चित्रपट निर्माते-दिग्दर्शक राज निदिमोरूसोबत लग्नगाठ बांधली. दोघे कायम एकमेकांना पाठिंबा देताना दिसतात. वयाच्या ३९ वर्षी सामंथा रुथ प्रभु आई होणार आहे.

सामंथा रुथ प्रभुचा 'मा इंति बंगारम' चित्रपट (Maa Inti Bangaaram) १९ जूनला रिलीज झाला आहे. Sacnilk च्या रिपोर्टनुसार, 'मा इंति बंगारम' चित्रपटाने जवळपास २५ कोटींचा व्यवसाय केला आहे. सामंथाने आजवर अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. सामंथा रुथ प्रभुने बॉलिवूडमध्येही काम केले आहे.

Samantha Ruth Prabhu Pregnancy
Cocktail 2 Collection : 'कॉकटेल २' फ्लॉप की हिट? रश्मिका-शाहिद-कृतीच्या 'लव्ह ट्रँगल'नं दोन दिवसांत किती कोटींचा गल्ला जमावला?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com