Samantha Ruth Prabhu Wedding: समांथा रुथ प्रभु गुपचुप उरकलं दुसरं लग्न; The Family Man च्या डायरेक्टरसोबत थाटला संसार

Samantha Ruth Prabhu Wedding: अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू आणि दिग्दर्शक राज निदीमोऱू यांनी ईशा योग केंद्रातील लिंग भैरवी मंदिरात गुप्तपणे लग्न केले. फक्त ३० पाहुण्यांच्या उपस्थितीत हा समारंभ पार पडला.
actress samantha married to boyfriend and director raj nidimoru
actress samantha married to boyfriend and director raj nidimoru Saam tv
Published On

Samantha Ruth Prabhu Wedding: दक्षिण भारतीय अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू आणि दिग्दर्शक-निर्माता राज निदीमोऱू यांनी सोमवारी सकाळी अत्यंत गुप्तपणे विवाह केल्याची खात्रीची माहिती समोर आली आहे. हा विवाहसोहळा कोयंबटूरमधील ईशा योग केंद्रातल्या लिंग भैरवी मंदिरात पार पडला. या समारंभाला फक्त जवळचे आणि निवडक असे एकूण ३० पाहुणे उपस्थित होते, अशी माहिती स्थानिक सूत्रांनी दिली आहे.

सूत्रांनुसार, सामंथाने विवाहासाठी लाल रंगाची पारंपरिक साडी नेसली होती.लग्नाच्या काही तासांपूर्वीच राज निदीमोऱू यांच्या माजी पत्नी श्यामली दे यांनी इंस्टाग्रामवर “हताश लोक अतिशय विचित्र गोष्टी करतात” अशी पोस्ट शेअर केली होती. या पोस्टनंतर या नात्याबद्दल पुन्हा चर्चा सुरू झाली.

actress samantha married to boyfriend and director raj nidimoru
V. Shantaram: भारतीय चित्रपटसृष्टीचे महान दिग्दर्शक 'व्ही. शांताराम' लवकरच मोठ्या पडद्यावर; 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

सामंथा आणि राज यांच्या नात्याच्या चर्चांना आधीपासूनच सोशल मीडियावर उधाण आले होते. २०२४ पासूनच दोघे एकत्र दिसत असल्याच्या बातम्या आणि चर्चांनी सुरु होत्या . सामंथानेही काही काळापूर्वी राज सोबतचे फोटो आपल्या इंस्टाग्राम स्टोरीत शेअर केले होते, यामुळे या चर्चांना अधिक चालना मिळाली.

actress samantha married to boyfriend and director raj nidimoru
Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन यांच्या जलसाबाहेर पुन्हा चाहत्यांची गर्दी; बिग बी झाले भावुक म्हणाले, 'मला जगण्याची प्रेरणा...'

सामंथा पूर्वी अभिनेता नागा चैतन्य यांच्यासोबत लग्न केले होते पण, त्यांचा २०२१ मध्ये घटस्फोट झाला. तर राज निदीमोऱू यांचे त्यांच्या पूर्व पत्नी श्यामली दे सोबत २०२२ मध्ये घटस्फोट झाला. राज हा प्रसिद्ध दिग्दर्शक असून त्याची फॅमिली मॅन ही वेब सिरीज प्रचंड गाजत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com