'कॉकटेल २' चित्रपट १९ जून ला थिएटरमध्ये रिलीज
'कॉकटेल २' हा रोमँटिक ड्रामा आहे.
'कॉकटेल २' मध्ये रश्मिका-शाहिद-कृतीचा 'लव्ह ट्रँगल' पाहायला मिळत आहे.
सध्या जगभरात रश्मिका मंदाना, शाहिद कपूर आणि कृती सनॉनचा 'कॉकटेल २' गाजत आहे. चित्रपटात भन्नाट 'लव्ह ट्रँगल' पाहायला मिळत आहे. तसेच सुंदर मैत्रीचे नाते देखील दाखवण्यात आले आहे. 'कॉकटेल २' चित्रपट १९ जून ला थिएटरमध्ये रिलीज करण्यात आला. चित्रपटाचे तगडे प्रमोशनही झाले. या रोमँटिक ड्रामाला तरूणाईमधून चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाने दोन दिवसांत रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे. चित्रपटाचे कलेक्शन जाणून घेऊयात.
Sacnilk च्या रिपोर्टनुसार, 'कॉकटेल २' चित्रपटाने दुसऱ्या दिवशी म्हणजेच वीकेंडला शनिवारी १६.२५ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. चित्रपटाने ओपनिंग डे ला १३.५० कोटी रुपये कमावले. दुसऱ्या दिवशी, 'कॉकटेल २' ने १०,२४५ शोजमधून १६.२५ कोटी रुपयांची नेट कमाई केली आहे, यामुळे भारतातील एकूण ग्रॉस कलेक्शन ३५.७० कोटी रुपये आणि एकूण नेट कमाई २९.७५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
परदेशात 'कॉकटेल २' चित्रपटाने दुसऱ्या दिवशी ८.०० कोटी रुपयांची कमाई केली, ज्यामुळे परदेशातील एकूण ग्रॉस कमाई १५.२५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. यामुळे दोन दिवसांची मिळून जगभरातील एकूण ग्रॉस कमाई ५०.९५ कोटी रुपये झाली आहे. यामुळे 'कॉकटेल २' चित्रपटाने ५० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री घेतली आहे.
पहिला दिवस: १३.५० कोटी रुपये
दुसरा दिवस: १६.२५ कोटी रुपये
एकूण: २९.७५ कोटी रुपये
मीडिया रिपोर्टनुसार, 'कॉकटेल २' ने दोन दिवसांच्या कमाईत शाहिद कपूरच्या 'ओ रोमियो'ला मागे टाकले आहे. 'ओ रोमियो'ने दोन दिवसांत २१.१५ कोटी रुपये कमावले होते. 'कॉकटेल २' ने दोन दिवसांत २९.७५ कोटी रुपये कमावले आहेत. तसेच 'कॉकटेल २' ने वरुण धवनच्या 'है जवानी तो इश्क होना है', कंगना रणौतच्या 'भारत भाग्य विधाता' आणि दिलजीत दोसांझच्या 'मैं वापस आऊंगा' यांसारख्या अलिकडेच प्रदर्शित झालेल्या बॉलिवूड चित्रपटांना मागे टाकले आहे. वरुण धवनच्या 'है जवानी तो इश्क होना है' ने दुसऱ्या दिवशी ७.७५ कोटी रुपये कमावले, तर 'भारत भाग्य विधाता' ने १.४५ कोटी रुपये कमावले, 'मैं वापस आऊंगा' ने दुसऱ्या दिवशी १.८५ कोटी रुपये कमावले.
'कॉकटेल २' हा होमी अदजानिया दिग्दर्शित रोमँटिक ड्रामा आहे. या चित्रपटाचे लेखन लव्ह रंजन आणि तरुण जैन यांनी केले असून, मॅडॉक फिल्म्स आणि लव्ह फिल्म्स यांनी याची संयुक्तपणे निर्मिती केली आहे. 'कॉकटेल २' चित्रपटातील 'बंधू २.०' हे गाणे सध्या प्रचंड गाजत आहे. जे मूळ गाजलेल्या 'तुम्ही हो बंधू' या गाण्याचेच एक नवीन रूप आहे. २०१२ मध्ये रिलीज झालेल्या 'कॉकटेल' चा 'कॉकटेल २' हा सीक्वल आहे. 'कॉकटेल' चित्रपटात सैफ अली खान, दीपिका पादुकोण, डायना पेंटी मुख्य भूमिकेत होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.