टिव्ही विश्वातून दुःखद बातमी समोर आली आहे. लोकप्रिय 'सिटकॉम' (कॉमेडी शो) कार्यक्रमांचे दिग्दर्शन करणाऱ्या जेम्स बरोज (James Burrows) यांचे शुक्रवारी निधन झाले. वयाच्या ८५ वर्षी दिग्दर्शकाने अखेरचा श्वास घेतला. जेम्स बरोज यांच्या निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली. तसेच त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. 30 वर्षांहून अधिक काळ टेलिव्हिजनचे प्रमुख सिटकॉम दिग्दर्शक म्हणून राज्य करणारे 'चीयर्स' चे सह-निर्माता जेम्स बरोज यांची प्राणज्योत मालावली.
variety च्या वृत्तानुसार, बरोज यांच्या कुटुंबीयांनी पीपल मासिकाला दिलेल्या निवेदनात जेम्स बरोज यांच्या निधनाची पुष्टी केली- "आज आपल्या प्रेमळ कुटुंबीयांच्या उपस्थितीत जेम्स बरोज यांनी शांतपणे अखेरचा श्वास घेतला. पाच दशकांहून अधिक काळ, बरोज हे टेलिव्हिजनच्या इतिहासातील सर्वात प्रभावशाली आणि लोकप्रिय दिग्दर्शकांपैकी एक होते. एक दिग्गज दिग्दर्शक, मार्गदर्शक आणि सर्जनशील व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांनी कॉमेडी शोच्या अनेक पिढ्यांना आकार दिला आणि जगभरातील प्रेक्षकांना असीम आनंद दिला..."
जेम्स बरोज यांनी ११ एमी पुरस्कार जिंकले. १९८० आणि १९८१ मध्ये 'टॅक्सी' (Taxi) या कॉमेडी शोमुळे त्यांना खूप लोकप्रियता मिळाली. त्यांनी 'पायलट', 'फ्रेंड्स' या शोचे दिग्दर्शन केले. १९९८ ते २०२० या काळात त्यांनी 'विल अँड ग्रेस' या मालिकेच्या प्रत्येक भागाचे दिग्दर्शन केले. जेम्स बरोज यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. त्यांनी १०० हून अधिक टिव्ही मालिकांचे दिग्दर्शन केले. 'डायरेक्टर्स गिल्ड ऑफ अमेरिका'तर्फे त्यांना दूरदर्शन दिग्दर्शनातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल 'जीवनगौरव पुरस्कारा'साठी निवडण्यात आले.
लॉस एंजेलिसमध्ये जन्म झालेले बरोज न्यूयॉर्कमधील 'हाय स्कूल ऑफ म्युझिक अँड आर्ट्स'मध्ये शिकले आणि त्यानंतर त्यांनी ओबरलिन कॉलेज व येल युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ ड्रामामध्ये शिक्षण घेतले.बरोज यांचे पहिले लग्न १९८१ मध्ये लिंडा सोलोमन यांच्याशी झाले. तर दुसरे लग्न १९९७ मध्ये डेबी ईस्टन यांच्याशी झाले. लिंडा सोलोमन यांच्याशी झालेल्या पहिल्या विवाहातून त्यांना तीन मुल आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.