Manasvi Choudhary
घराची स्वच्छता हा आपल्या दैंनदिन जीवनाचा भाग बनला आहे. घरातील विविध इलेक्ट्रिक वस्तूंची स्वच्छता केली जाते. मात्र टिव्ही, वॉशिंग मशीन, ओव्हन, गॅस या वस्तूंची स्वच्छता कशी करावी असा प्रश्न अनेक महिलांना पडतो.
टिव्ही साफ करताना टिव्हीची स्क्रिन अत्यंत नाजूक असते अशावेळी योग्य काळजी घेऊन ती पुसावी. यासाठी आज आम्ही तुम्हाला टिव्ही स्क्रिन कशी स्वच्छ करायची हे सांगणार आहोत.
टिव्ही स्क्रिनची साफ सफाई करताना टिव्ही पूर्णपणे बंद करावा. एखाद्या मऊ कापडाने स्क्रिनवरील धूळ हळुवारपणे पुसून टाका.
स्क्रिनवर कोणतेही डाग असतील तर ते क्लीनर स्प्रे थेट पुसू नका यासाठी एका मऊ कापडावर क्लिनर टाका आणि मगच पुसा.
टिव्ही स्क्रिन साफ करताना कोणतेही लिक्विड थेट स्क्रिनवर फवारणे हे अत्यंत चुकीचे आहे.
स्क्रबिंग साईड स्पंजचा वापर टिव्ही स्क्रिन साफ करण्यासाठी करू नये यामुळे लहान कण आणि धूळ स्क्रिनवर जमा राहते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.